शैक्षणिक
…या शहरात नव्याने होमिओपॅथीक व आयुर्वेद महाविद्यालय सुरु
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जुन्या मुंबई-नागपुर महामार्गालगत असणाऱ्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाविद्यालयात यावर्षीसून आणि होमिओपॅथीक व आयुर्वेद महाविद्यालय नव्याने सुरवात झाली असून बी.ए.एम.एस आणि बी.एच.एम.एस पहिल्या वर्षीच्या एकूण प्रवेशाची संख्या पूर्ण झाली आहे.
“राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाविद्यालयात विद्यार्थी संख्या १६० असून आयुर्वेदा महाविद्यालयासाठी ६० तर होमिओपॅथीक कॉलेजसाठी १०० असे एकूण १६० विद्यार्थ्यांची संख्या प्रथम वर्षासाठी पूर्ण झाली झाली आहे”-प्रसाद कातकडे.विश्वस्त,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन कोपरगाव.
सदर महाविद्यालयात विद्यार्थी संख्या १६० असून आयुर्वेदा महाविद्यालयासाठी ६० तर होमिओपॅथीक कॉलेजसाठी १०० असे एकूण १६० विद्यार्थ्यांची संख्या प्रथम वर्षासाठी पूर्ण झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दि.२२ मे २०२२ रोजी कॉलेजच्या पहिल्या दिवशी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा स्वागत सोहळा कार्यक्रम नुकताच ठेवण्यात आला होता.
सदर प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,विश्वस्त,प्रणित कातकडे,डाँ.पूजा कातकडे,बेबी कातकडे,अनुप कातकडे,सल्लागार दीपक कोटमे,प्रदीप फुंडे,रेनबो इंटरनॅशनल स्कुलचे अध्यक्ष अध्यक्ष नागरे,होमिओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.सावनी यरनाळंकर,आयुर्वेदा महाविद्यालयाचे डॉ.योगेश कुमार गीते,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य प्रा. इरशाद अली व सर्व कॉलेजचे प्राचार्य व शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.अमोल घनघाव यांनी केले तर आयुर्वेदा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नारायण पाटील यांनी आयुर्वेदा विषयाबद्दल तर डॉ.शीतलकुमार सोनवणे यांनी होमिओपॅथीक विषयाबद्दल मनोगत व्यक्त केले आहे.
सदर प्रवेशासाठीच्या नियोजनाबद्दल आयुर्वेदाचे प्राचार्य डॉ.सावनी यरनाळकर तर होमियोपॅथी महाविद्यालयाचे डॉ.गीते यांचा सत्कार चांगदेव कातकडे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.विनया भांगे,डॉ.कल्याणी चुडीवाल यांनी केले.उपस्थितांचे आभार डॉ.लक्ष्मण पाटील यांनी मानले आहे.