शैक्षणिक
नाट्यकला अवगत करणे सोपी बाब नाही-कोपरगावात माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अभिनय शिकण्यासाठी अभिनयाच्या युक्त्या,क्लृप्त्या माहीत असणे आवश्यक आहे.नाटकात ठरवून गोष्टी कराव्या लागतात.त्यासाठी नियमित सराव,स्मरण तसेच आपले मन,शरीरासह अनेक गोष्टी एकत्र बांधाव्या लागतात.स्वतःला शिस्तीत ठेवावे लागते.एकूणच नाट्यकला अवगत करणे सोपे नाही,त्यासाठी तपश्चर्या करावी लागते असे आग्रही प्रतिपादन कोपरगाव येथील लद्दे ड्रामाटिक्स अँड सॉफ्ट स्किल एज्युकेशनचे संस्थापक डॉ.किरण लद्दे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“लोकसंस्कृती लोप पावत असताना मनोरंजनाची नवी साधने निर्माण होत आहेत.या पार्श्वभूमीवर अलीकडे नाट्यकलेचा विस्तार व विकास नव्या धर्तीवर होत आहे.बदलत्या संस्कृतीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्यातील ‘स्व’ ला जागृत करीत स्वतःमधील अभिनय कलेचा विकास करावा”-डॉ.रमेश सानप,प्राचार्य,श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात मराठी व सांस्कृतिक विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप होते.
या प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर,परीक्षा विभाग प्रमुख डॉ देविदास रणधीर,डॉ.माधव यशवंत,डॉ.कैलास महाले,प्रा.रावसाहेब दहे,प्रा.संपत आहेर,आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना हणाले की,”नाटक ही ठरवून करण्याची कला आहे.नाटकामध्ये शारीरिक भाषा महत्वाची असते.शिवाय नाट्यकला शिकतांना ‘स्व’ मधील पैलू उलगडले जातात.आपण अभिनय क्षेत्रात कसे आलो हे स्पष्ट करताना प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्याना त्यांनी नाट्यकलेचे, अभिनयाचे धडे दिले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी केले.तरसूत्रसंचलन कू.प्रिती काळे व वैशाली घोटेकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय कु.आदिती घोटेकर हिने करुन दिला तर उपस्थितांचे आभार कु.पूजा धोक्रट हिने मानले आहे.