शैक्षणिक
मोडी लिपी टिकणे हि वर्तमान काळाची गरज-कोपरगावात प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आधुनिक काळात मोडी लिपी ही रोजगारासाठी आवश्यक असून मोडी लिपीचे ज्ञान अवगत केल्यास पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो.मात्र मोडी लिपी आज अस्तंगत होत आहे अशा परिस्थितीत तिचे महत्व लक्षात घेऊन ती टिकणे व टिकवणे गरजेचे आहे असे आग्रही प्रतिपादन पुणे येथील वसुंधरा भाषा,मोडी लिपी संशोधन व संवर्धन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष महेश जोशी यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
मोडी ही १३व्या शतकापासून २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती.महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला.छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बाळबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला.हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली होती.
कोपरगाव येथील श्री.सद्गुरू गांगागीर महाराज महाविद्यालयात इतिहास विभागामार्फत आयोजित दोन दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते त्यावेळी उद्घानप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप होते.
सदर प्रसंगी प्रा.प्रमोद चव्हाण,प्रा.सतीश देबडे,प्रा.सुनील काकडे आदींसह इतिहास विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मोडी लिपीतून आपणास इतिहास समजतो.यासाठी प्रत्येकाने मोडी लिपी आत्मसात करणे आवश्यक आहे.त्यावेळी त्यांनी दोन दिवसाच्या या कार्यशाळेत महेश जोशी यांनी विद्यार्थ्याना मोडी लिपीचे धडे दिले आहे.कार्यशाळेचा समारोप सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यशाळा समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख प्रा.किरण पवार यांनी केले.सूत्रसंचलन प्रा.डॉ.बी.बी.देवकाते यांनी केले तर प्रा.संदीप हिरगळ यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.