शैक्षणिक
शेती पूरक लघु उद्योगाच्या विकासातून ग्रामीण भागात कायापालट होईल-आशावाद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायाला आज खूप चांगले दिवस आहेत.लघु शेती व्यवसायातून मोठ मोठे उद्योग सुरु करता येतात.एकंदरीत शेती पूरक लघु उद्योगाच्या विकासातून ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास मदत होईल असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व आर.बी.एन.बी.कॉलेज श्रीरामपूर येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.एन.सी.पवार यांनी कोपरगाव येथे बोलताना केले आहे.
“जगाच्या तुलनेत आपल्याकडील शेतीवास्तव समाधानकारक आहे.तरी देखील ग्रामीण भागात शेती परवडत नाही अशी ओरड वारंवार होतांना दिसते.त्यातच आजचा तरुण शेती व्यवसायाबद्दल प्रचंड उदासिन आहे.ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे”-प्रा.डॉ.एन.सी.पवार,मॅनेंजींग कॉऊन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा.
कोपरगाव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात आय.क्यू.ए.सी व अर्थशास्त्र विभागांतर्गत ‘शेती आधारित लघु उद्योग आणि ग्रामीण विकास’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप होते.
सदर प्रसंगी अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ.योगिता भिलोरे,प्रा.यु.बी.जाधव,प्रा.कु.ए.जी.पाटोळे आदींसह अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”जगाच्या तुलनेत आपल्याकडील शेतीवास्तव समाधानकारक आहे.तरी देखील ग्रामीण भागात शेती परवडत नाही अशी ओरड वारंवार होतांना दिसते.त्यातच आजचा तरुण शेती व्यवसायाबद्दल प्रचंड उदासिन आहे.ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे.बेरोजगारीवर मात करण्यासाठी त्यांनी कृषी व्यवसायाकडे गांभीर्याने पहिले पाहिजे,कारण ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था समृद्ध होणार नाही असेही ते शेवटी म्हणाले आहे.
सदर प्रसंगी प्राचार्य डॉ.रमेश सानप म्हणाले की,”पदवी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी कौशल्याधिष्ठीत ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे.शेती आधारित लघु उद्योगाच्या विकासात या ज्ञानाचा निश्चित उपयोग होऊ शकतो.युवा वर्गाने ग्रामीण शेती विकास व शेती पूरक व्यवसायाच्या विकासात योगदान द्यावे.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात कोपरगाव येथील सदन कुक्कुटपालन प्रकल्पातील कोपरगाव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.सुशील कोळपे,डॉ.श्रद्धा काटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
चर्चासत्राचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख व चर्चासत्र समन्वयक प्रा.सुनील सालके यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सौ.वाय.के.बागुल यांनी केले.प्रा.डॉ.बी.एम.वाघमोडे यांनी आभार मानले आहे.