शैक्षणिक
गंगागिरी महाराज महाविद्यालयात एक दिवशीय उपक्रम संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयांत आय.क्यु.ए.सी. व स्टाफ अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅन एन्सुरिंग क्वालिटी इन इन्स्टिट्यूशन इन नॅक प्रिपरेशन’ या विषयावरील एक दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे माजी लेखापरिक्षक व पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे आय.क्यु.ए.सी.समन्वयक डॉ.निलेश मालपुरे,कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा.ए.के.देशमुख,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.विजय निकम,सर्व क्रायटेरिया प्रमुख,विभागप्रमुख,आदींसह महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
पहिल्या सत्रात पुणे येथील डॉ.आंबेडकर महाविद्यालय आय.क्यु.ए.सी.समन्वयक डॉ. सविता पाटील यांनी ‘द रोल ऑफ आय.क्यु.ए.सी.अॅण्ड इट्स नॅक फ्रेमवर्क’ या विषयावर तर प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांनी ‘बेंचमेकिंग इन नॅक डॉक्युमेंटेनशन पजेस टू एस.एस.आर.व्हाया फॉरमॅटस’ या विषयी मार्गदर्शन केले आहे.
तर दुसऱ्या सत्रात प्रा.एस.बी.पाटील यांनी ‘जिमखाना अॅण्ड एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटी-कल्चरल,एन.एस.एस.,एन.सी.सी.या संबंधात तर प्रा.सायली गोसावी यांनी ‘फिडबॅक सिस्टीम’ या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.
सदर प्रसंगी उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी केले आहे.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रा.उत्तम गवळी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.सुनील काकडे व प्रा.जी.डी.भगत यांनी करून दिला आहे.कार्यक्रमांचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.माधव यशवंत यांनी केले.प्रा.डॉ.एन.एम.चव्हाण यांनी आभार मानले.