शैक्षणिक
कोपरगावातील…हे महाविद्यालय गुणवत्ता शिक्षणासाठी कटिबद्ध-प्राचार्य

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात विद्यार्थ्याचा सर्वांगीन विकास,गुणवत्तापूर्ण शिक्षण,स्वयंशिस्त हे गुण अत्यंत महत्वपूर्ण असून याबाबत सोमैय्या महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव शहरातील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नुकताच पालक मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानवरून बोलत होते.
“विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याप्रती जागरूक राहून,तो देशाचा परिपूर्ण नागरिक बनेल यासाठी प्रयत्नशील रहावे.विद्यार्थी ५ तास महाविद्यालयात व १८ तास पालकांसोबत असल्याने पालकांनीही आपली जबाबदारी लक्षात घेऊन पाल्याला मोबाईल दिला,पण त्याचा वापर तो कसा करतो ते काळजीपूर्वक बघावे.कमीतकमी दोन महिन्यातून एकदा महाविद्यालयात येऊन आपल्या पाल्याच्या प्रगतीची चौकशी करावी त्यामुळे धोका कमी होईल”-डॉ.बी.एस.यादव,प्राचार्य,के.जे.सोमैय्या महाविद्यालय कोपरगाव.
सदर प्रसंगी चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.ज.बारे,महेश वाकचौरे,निवृत्ती सोनवणे,राजेंद्र बोरनारे,भगवान सूर्यवंशी आदीसह पालक प्रतिनीधीनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,“गेली दोन वर्ष कोरोनामुळे शिक्षणक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात नसल्यामुळे अध्ययन प्रक्रिया पूर्ण बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे व सचिव अॅड.संजीव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आमच्या महाविद्यालयाने ऑनलाईन अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांना सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले.पालकांनी आपल्या पाल्याप्रती जागरूक राहून,तो देशाचा परिपूर्ण नागरिक बनेल यासाठी प्रयत्नशील रहावे.विद्यार्थी ५ तास महाविद्यालयात व १८ तास पालकांसोबत असल्याने पालकांनीही आपली जबाबदारी लक्षात घेऊन पाल्याला मोबाईल दिला,पण त्याचा वापर तो कसा करतो ते काळजीपूर्वक बघावे.कमीतकमी दोन महिन्यातून एकदा महाविद्यालयात येऊन आपल्या पाल्याच्या प्रगतीची चौकशी करावी.आपला पाल्य योग्य मार्गाने जात आहे की नाही याकडेही लक्ष दिल्यास तो नक्की यशस्वी होईल असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी केले.तर सूत्रसंचालन ए.एफ.सूर्यवंशी व कु.एम.पी.निळेकर यांनी केले व शेवटी प्रा.जी.एन.डोंगरे यांनी आभार मानले.