“समता इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या १० व्या क्रीडा महोत्सवामुळे देशातील,परदेशातील खेळांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी,जीवनात खेळांचे महत्त्व लक्षात घेऊन समताच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या सक्षम बनावे”-संदीप कोयटे,कार्यवाहक,समता इंटरनॅशनल स्कुल.
कोपरगाव नजीक असलेल्या कोकमठाण हद्दीतील समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सदर प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि समताच्या शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन,उपप्राचार्य समीर अत्तार यांच्यासह समता पालक प्रतिनिधी समितीच्या सदस्या राधिका शिरोडे, वर्षा डमरे,मधुरा जोशी, वंदना राय,जिग्ना पोरवाल,रोहिणी वक्ते,रोहिणी होन,रुपाली साखरे,आचल गुजराणी,सारिका भुतडा,किरण सोनकुसळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्कूलचे मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे म्हणाले की,”समता इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या १० व्या क्रीडा महोत्सवामुळे देशातील,परदेशातील खेळांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी,जीवनात खेळांचे महत्त्व लक्षात घेऊन समताच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या सक्षम बनावे. वर्तमानात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर मोबाईल चा वापर करत आहे. त्यांच्या मैदानी खेळावर लगाम लागला आहे.अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देऊन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे,त्यांचा आत्मविश्वास वाढविणे खूप गरजेचे आहे.
समता २०२१ चे वार्षिक क्रीडा पारितोषिक समताच्या झेनिथ हाऊसला मिळाले. प्राथमिक विभागातील मुलांमध्ये उत्कृष्ट अॅथलेटिक म्हणून इ ४ तील आर्किड गटाचे नेतृत्व करत अंश ठोळे तर मुलींमध्ये इ ५ वीतील ट्युलिप गटाचे नेतृत्व करत कृती पहाडे, माध्यमिक विभागातील मुलांमध्ये इ १० वीतील आर्किड गटाचे नेतृत्व करत समर्थ मोरगे तर मुलींमध्ये इ १० वीतील आर्किड गटाचे नेतृत्व करत नंदिनी कलंत्री हिने यश संपादन करत भरघोस बक्षिसे आणि पारितोषिके मिळवली.यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना समता स्कूलचे क्रीडा विभागप्रमुख रोहित महाले,उत्सव गांधी,शुभम औताडे, इमरान शेख यांचे मार्गदर्शन लाभले
समता २०२१ चे वार्षिक क्रीडा पारितोषिक समताच्या झेनिथ हाऊसला मिळाले. प्राथमिक विभागातील मुलांमध्ये उत्कृष्ट अॅथलेटिक म्हणून इ ४ तील आर्किड गटाचे नेतृत्व करत अंश ठोळे तर मुलींमध्ये इ ५ वीतील ट्युलिप गटाचे नेतृत्व करत कृती पहाडे, माध्यमिक विभागातील मुलांमध्ये इ १० वीतील आर्किड गटाचे नेतृत्व करत समर्थ मोरगे तर मुलींमध्ये इ १० वीतील आर्किड गटाचे नेतृत्व करत नंदिनी कलंत्री हिने यश संपादन करत भरघोस बक्षिसे आणि पारितोषिके मिळवली.यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना समता स्कूलचे क्रीडा विभागप्रमुख रोहित महाले,उत्सव गांधी,शुभम औताडे, इमरान शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
३१ डिसेंबर रोजी बक्षिस वितरण मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे आणि पालक प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा महोत्सवात यशस्वी संघांना विविध प्रकारातील बक्षिसे,पारितोषिके आणि सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.क्रीडा महोत्सव यशस्वीतेसाठी समता स्कूलचे क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उत्सवाचे सुत्रसंचलन इ ९ वीतील विद्यार्थी दिव्य आढाव आणि पलक भुतडा यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्य क्रीडा प्रतिनिधी कामरान अत्तार याने मानले आहे.