जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

संवत्सर येथील परजणे महाविद्यालयाचा निकाल जाहीर

न्यूजसेवा
कोपरगांव-(प्रतिनिधी)

संवत्सर येथील प्रिशदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित नामदेवराव परजणे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी केंद्र परीक्षेत १०० टक्के निकाल लागला असून महाविद्यालयाने याही वर्षी यशाची परंपरा कायम टिकवली आहे.

या यशाबद्ल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजेश परजण,खा.डॉ. सुजय विखे,संस्थेचे सचिव प्रा.डॉ.हरिभाऊ आहेर,महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी सुनिताताई कदम,प्राचार्य युवराज सदाफळ यांनी अभिनंदन केले आहे.

संवत्सर येथील या महाविद्यालयाच्या कला शाखेत विद्यार्थीनी कु. गायत्री दत्तात्रय मंचरे हिने ८५.६६ टक्के गुण मिळवीत प्रथम येण्याचा मान मिळविला. तर कु. कावेरी जालिंदर पवार हिने ७४.८३ टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक तर दीपक कैलास सोनवणे याने ७२.६६ टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच विज्ञान शाखेत कु. दिव्या नवनाथ सोनवणे हिने ९४.३३ टक्के गुण मिळवीत प्रथम येण्याचा मान मिळविला तर कु. ऐश्वर्या सुनिल ठोंबरे हिने ९१.८३ टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक तर नितीन लक्ष्मण ठोंबरे याने ८९ .३३ टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. वाणिज्य शाखेत कु. वैष्णवी दिलीप शेटे हिने ८७.३३ टक्के गुण मिळवीत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर कु. गायत्री अनिल आबक हिने ८२.३३ टक्के गुण मिळवीत द्वितीय तर कु. मोना संतोष चव्हाण हिने ८०.०५ टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

या यशाबद्ल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजेश परजण,खा.डॉ. सुजय विखे,संस्थेचे सचिव प्रा.डॉ.हरिभाऊ आहेर,महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी सुनिताताई कदम,प्राचार्य युवराज सदाफळ यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close