शैक्षणिक
कोपरगावात सूक्ष्मजीवशास्रावरील तीन ग्रंथाचे प्रकाशन संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभागप्रमुख प्रा.आकाश पवार व त्यांचे सहकारी डॉ.योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात मायक्रोबायोलॉजी विभागातील प्रा. पूजा गख्खड, प्रा.प्रगती शेटे,प्रा.वृषाली आहेर व प्रा.प्रियंका शिरसाठ अशा सहा प्राध्यापकांनी मिळून मायक्रोबायोलॉजी विषयाचे तीन संदर्भ ग्रंथांचे लेखन केले असून त्यांचे प्रकाशन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखेस सूक्ष्मजीवशास्त्र /मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात.सूक्ष्मजीवांमध्ये असे जीव असतात जे नग्न डोळ्यांनी पाहण्यास फारच लहान असतात आणि त्यात जिवाणू, बुरशी आणि व्हायरससारख्या गोष्टींचा समावेश होतो.सूक्ष्मजीवशास्त्रात सूक्ष्मदर्शक, जननशास्त्र आणि संवर्धन सारख्या साधनांचा वापर करून अभ्यासाचा अभ्यास करतात.त्यावर कोपरगावात ग्रंथ निर्माण होणे हि बाब आक्रीतच मानवी लागेल.
याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव पुढे म्हणाले की,”या ग्रंथांमध्ये एफ.वाय.बी.एस्सी.च्या अभ्यासक्रमावर आधारित ‘बेसिक टेक्निक्स इन मायक्रोबायोलॉजी’,एस.वाय.बी.एस्सी अभ्यासक्रमाशी निगडित ‘मेडिकल मायक्रोबायोलॉजी अँड इम्म्युनॉलॉजी ‘ आणि टी. वाय. बी. एस्सी अभ्यासक्रमावर आधारित ‘मेडिकल मायक्रोबायोलॉजी’ अशा तीन ग्रंथांचा समावेश आहे.मायक्रोबायोलॉजी विषयात पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण घेणाऱ्या व सेट-नेट परीक्षेची उमेदवारांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून हे ग्रंथ अत्यंत उपयुक्त असल्याचेही ते शेवटी म्हणाले आहे.
पुणेस्थित इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबियल सायन्सेस या संस्थेमार्फत हे तिन्ही ग्रंथ प्रकशित करण्यात आले आहेत.या तीनही ग्रंथांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजी विषयाच्या पदवीसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून लवकरच समावेश होणार असल्याची माहिती मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख प्रा.आकाश पवार यांनी दिली आहे. हे तीनही ग्रंथ अमेझॉन किंडलच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मायक्रोबायोलॉजी विभागाचे डॉ. योगेश चौधरी यांनी दिली.प्रा. आकाश पवार व डॉ. योगेश चौधरी यांचे यापूर्वी संबंधित विषयात शोधनिबंध देखील प्रकाशित झाले आहेत. सध्या त्यांचे पुढील संशोधन कार्य देखील सुरु आहे. प्रा. पवार व त्यांच्या सहकार्यांना पुढील संशोधनासाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी,सदस्य संदीप रोहमारे व कार्यालय अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे यांनी अभिनंदन केले आहे.