जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावातील बहीण-भावांनी फडकवला परदेशात झेंडा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे सुपुत्र चि.शिवराज मंगेशराव पाटील हे बी.ई.सिव्हिल नंतर एम.एस.पदवी संपादन करणारे कोपरगाव तालुक्यातील पहिले विद्यार्थी ठरले आहे.तर कु.शिवांजली मंगेशराव पाटील ही बी.ई.सिव्हिल नंतर (PDGM-ACM) ॲडव्हान्स कन्ट्रक्शन मॅनेजमेंट पदवी संपादन करणारी कोपरगाव तालुक्यातील पहिली विध्यार्थीनी ठरली असून या बहीण-भावांनी परदेशात आपल्या यशाचा झेंडा फडकावला आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

चि.शिवराज आणि कु.शिवांजली हे संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षी विद्या मंदिर येथे शालेय शिक्षण झाले.तर श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालय येथे या दोघांनी १२ पर्यंत विज्ञानाची पदवी संपादन करत पुढील शिक्षण संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात बांधकाम (सिव्हिल) पदवी संपादन केली आहे.त्यानंतर कु.शिवाजली हिने बी.ई.सिव्हिल मध्ये सरत्या ( वर्षात ) कॉलेज मध्ये पहिली आली होती.

कोपरगाव तालुक्यातील शिवराज पाटील या तरुणाने अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथून बांधकाम क्षेत्रातील कन्स्ट्रक्शन मॅनजमेंट व्यवस्थापनात मास्टर पदवी संपादन केली आहे.अशी उच्च पदवी संपादन केलेले कोपरगाव तालुक्यातील सिव्हिल क्षेत्रातील ते पहिले पदवीधर ठरले आहे.शिवराज पाटील यांचे आजोबा संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त बांधकाम अभियंता माधवराव पाटील यांनी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर कोल्हापूर पध्दतीचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व तालुक्यात छोटे-मोठे बंधारे आणि बांधकाम क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.त्यांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव मोठा राहिला आहे.पुढे तोच वारसा चालवत त्याचा सुपुत्र माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी कोपरगाव शहरातील शिवस्मारक सह विविध राष्ट्र पुरुषांची स्मारके उभारणी तसेच विविध बांधकामांच्या माध्यमातून नावलौकिक मिळविला आहे.नगराध्यक्ष पदाच्या अल्पावधी मिळाला असतानाही त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.सध्या ते महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी असतात.मंगेश पाटील यांचा सिव्हिल क्षेत्रातील अनुभव या पूर्वी अनेकांच्या स्मरणात आहे.चि.शिवराज याने आजोबा (माधवराव), वडील (मंगेशराव) यांचा बांधकाम क्षेत्रातील वारसा पुढे चालवत ठेवण्याचा निर्णय घेवून बांधकाम क्षेत्रातील उच्च पदवी संपादन केली आहे.

चि.शिवराज आणि कु.शिवांजली हे संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षी विद्या मंदिर येथे शालेय शिक्षण झाले.तर श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालय येथे या दोघांनी १२ पर्यंत विज्ञानाची पदवी संपादन करत पुढील शिक्षण संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात बांधकाम (सिव्हिल) पदवी संपादन केली आहे.त्यानंतर कु.शिवाजली हिने बी.ई.सिव्हिल मध्ये सरत्या ( वर्षात ) कॉलेज मध्ये पहिली आली होती. नंतर पुणे येथे निकमार (NICMAR) कॉलेज येथून दोन वर्षांची ॲडव्हान्स कन्ट्रक्शन मॅनेजमेंट (PDGM-ACM) ही पदवी संपादन केली आहे.अशी पदवी संपादन करणारी ती कोपरगांव तालुक्यातील पहिली मुलगी आहे.तर चि.शिवराज याने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात बांधकाम (सिव्हिल) पदवी संपादन केल्या नंतर बांधकाम क्षेत्रातील उच्च पदवी संपादन करण्यासाठी त्यांचे वडील मंगेश पाटील यांनी प्रेरीत केले होते.त्यानंतर त्याने अमेरिकेतील लाॅस एन्जलिस येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथून बांधकाम क्षेत्रातील व्यवस्थापनात पदव्यूत्तर शिक्षण संपादन केले आहे.अशी उच्च पदवी संपादन केलेले कोपरगाव तालुक्यातील ते पहिले पदवीधर ठरले आहे.कोपरगाव तालुक्यातील शिक्षणात पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चि.शिवराज आणि कु.शिवांजली प्रेरणास्रोत बनले आहे.त्यांचा यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close