शैक्षणिक
जनता इंग्लिश स्कूलचा निकाल जाहीर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयाचा शाळांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तो शंभर टक्के लागला असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव तालुकयातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूलचा शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयात प्रथम क्रमांक कुमारी शिंदे प्रगती राजेंद्र हिने मिळवला असून ती ४७६ गुण (९५.२०) टक्के मिळवून प्रथम आली आहे.तर द्वितीय स्थानी पुंगळे दीपिका भाऊसाहेब हिने ४७३ गुण मिळवून (९४.६० टक्के) गुण मिळवून द्वितीय आली आहे.तर तृतीय स्थानी जयेश किरण ससाने व धनश्री गणेश पाटील यांनी समान ४६४ गुण ९२.८० % गुण मिळवून स्थान राखले आहे. तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम विजया सुनिल पगारे ४५७ गुण ९१.४० % प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक कल्याणी यादव दैने ४५२ गुण ९०.४०% तृतीय क्रमांक सौख्यदा ज्ञानेश्वर आचारी ४३८ गुण ८७.६० % हिने मिळवला आहे.यामध्ये प्रविष्ट विद्यार्थी १३४ व उत्तीर्ण विद्यार्थी १३४ आहेत.त्यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त ६१, प्रथम श्रेणी प्राप्त ४८,द्वितीय श्रेणी प्राप्त २३, तृतीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी ०२ आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक खरात जे. के.,पर्यवेक्षक श्रीअंबिलवादे एस.आर.,याचप्रमाणे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य,शाळा व्यवस्थापन,समिती सदस्य सल्लागार समिती सदस्य,आदींनी अभिनंदन केले आहे.