जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी नोकर होण्याऐवजी उद्योजक व्हावे-…यांचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या कष्टातून आणि कौशल्यातून व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करावा.मोठी स्वप्ने जरूर पहा,मात्र त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सुरुवात छोट्या व्यवसायापासून करा.छोट्या व्यवसायातून अनुभव,आत्मविश्वास आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करून पुढे व्यवसायाचा विस्तार करता येत असल्याचे प्रतिपादन “गोदावरी इक्विपमेंट्स प्रा.लि.चे संस्थापक भाऊसाहेब कळवाघे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

  

   “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय ही एक उत्तम संधी आहे.शेती ही केवळ उपजीविकेचे साधन न राहता उद्योजकतेचे माध्यम बनली पाहिजे.ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्थानिक उपलब्ध संसाधने,शेतीतील समस्या आणि बाजारपेठेच्या गरजा ओळखून त्यातून नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण कराव्यात”-भाऊसाहेब कळवाघे,संस्थापक,“गोदावरी इक्विपमेंट्स प्रा.लि.

    स्टार्टअप अँड इनोव्हेशन सेल हा प्रामुख्याने शैक्षणिक संस्था (महाविद्यालये, विद्यापीठे) आणि शासकीय स्तरावर तरुण विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला एक विशेष विभाग असून याचे मार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नोकरी मागण्याऐवजी ‘नोकरी देणारा’ (उद्योजक) बनण्याची मानसिकता तयार करण्याचे काम केले जात आहे.विद्यार्थ्यांच्या डोक्यातील नवनवीन व्यावसायिक कल्पनांना प्रत्यक्ष उत्पादनात किंवा सेवेत रूपांतरित करण्यासाठी मदत करणे.व्यवसाय कसा सुरू करावा,खेळते भांडवल कसे उभे करावे आणि मार्केट रिसर्च कसा करावा,याचे प्रशिक्षण दिले जात आहे.त्याअंतर्गत कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष,स्टार्टअप अँड इनोव्हेशन सेल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन,इनक्यूबेशन अँड एंटरप्रायझेस यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअप सिरीज-.0.2 अंतर्गत ‘ग्रामीण स्टार्टअप्स: आव्हाने,संधी आणि यशोगाथा’ या विषयावर आयोजित व्याख्यान आयोजित व्याख्यानसत्रात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजय ठाणगे होते.



  सदर प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.सदाशिव नागरे,डॉ.शंकरय्या कोंडा,डॉ.रवींद्र जाधव,प्रा.वैष्णवी मगर आदी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय ही एक उत्तम संधी आहे.शेती ही केवळ उपजीविकेचे साधन न राहता उद्योजकतेचे माध्यम बनली पाहिजे.ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्थानिक उपलब्ध संसाधने,शेतीतील समस्या आणि बाजारपेठेच्या गरजा ओळखून त्यातून नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण कराव्यात” असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

यावेळी अध्यक्षस्थानवरुन बोलताना प्राचार्य डॉ.विजय ठाणगे म्हणाले की,”महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता,नवोपक्रम आणि स्टार्टअपची संस्कृती विकसित व्हावी,यासाठी महाविद्यालयाचा स्टार्टअप अँड इनोव्हेशन सेल सातत्याने विविध उपक्रम,व्याख्याने व मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करीत असतो.

  सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.नामदेव ढोकळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.चंचल विभुते,प्रा.कीर्ती वाकचौरे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार डॉ.निलेश पोटे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close