जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

ऊर्जा विकास अभिकरण स्पर्धा…या विद्यार्थ्यांचे यश!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  शालेय विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचत व ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (एम.इ.डी.ए.) व शालेय विभाग,पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकला,निबंध व घोषवाक्य स्पर्धांमध्ये श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केलेव आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या या यशामागे कला अध्यापक हेमंत गीते,मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा पुजारी,प्राचार्या स्वप्ना जगताप तसेच शैक्षणिक संकुलाचे  प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.

   या स्पर्धांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी या गटातील सुमारे २८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.शालेय स्तरावरील निकालानुसार निबंध स्पर्धेत इयत्ता सहावी ‘ब’ मधील अर्णव लहाणू सोनवणे यांनी प्रथम,इयत्ता सातवी ‘ब’ मधील विशाखा गणेश म्हाशाळ यांनी द्वितीय,तर इयत्ता सातवी ‘अ’ मधील जानवी अशोक गायके यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. चित्रकला स्पर्धेत इयत्ता सहावी ‘अ’ मधील अफिफा मन्सूर सय्यद यांनी प्रथम,इयत्ता सातवी ‘अ’ मधील झोया नासिर हुसेन शेख यांनी द्वितीय,तर इयत्ता पाचवी ‘ब’ मधील शताक्षी संदीप पवार यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.घोषवाक्य स्पर्धेत इयत्ता सहावी ‘अ’ मधील वेदांत महेंद्र गायकवाड यांनी प्रथम,आयुष राहुल गोंदकर यांनी द्वितीय,तर इयत्ता सातवी ‘ब’ मधील आपूर्वा अमोल शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
 
   दरम्यान विद्यार्थ्यांच्या या यशामागे कला अध्यापक हेमंत गीते,मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा पुजारी,प्राचार्या स्वप्ना जगताप तसेच शैक्षणिक संकुलाचे  प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय स्पर्धा समितीच्या सोनिया ठोकळ,विकास निर्मळ,वैजयंती गाजरे,शेखर पवार तसेच सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले होते.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close