जाहिरात-9423439946
शैक्षणिक

क्रांतिकारी कल्पना विकसित करणे म्हणजे संशोधन-डॉ.निमसे

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सीमा ओलांडून नवीन क्रांतिकारी कल्पना विकसित करणे म्हणजे संशोधन असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी नुकतेच कोपरगाव येथील चर्चासत्रात बोलताना केले आहे.

के.जे.सोमैया महाविद्यालयात बोलताना माजी कुलगुरू सर्जेराव निमसे दिसत आहेत.

“संशोधनासारख्या विषयावर आयोजित या चर्चासत्राच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतुन नवनिर्माण साकार होण्यास मदत होणार असतानाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व संशोधनपुरक दृष्टिकोण वाढीसाठी महाविद्यालय सदैव कटिबध्द राहणार आहे”-संदीप रोहमारे,विश्वस्त,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.

   कोपरगाव स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय सेमिनार नुकतेच संपन्न झाले त्याचे उद्घाटन डॉ.निमसे यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी लिहिलेल्या 68 शोध निबंध संशोधन पत्रिकेचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते  करण्यात आले आहे तो क्षण.

  सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदिप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,डॉ.एस.जी.कोंडा,डॉ.पी.बी.शेळके,डॉ.ए.एस. वाणी,डॉ.एस.एन.शेळके,डॉ.जी.जी.मंदावाड आदीसह विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयातील संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कटिंग एज रिसर्च हे सध्या सुरू असलेले अत्यंत प्रगत,नाविन्यपूर्ण आणि उच्च-स्तरीय संशोधन असल्याचे सांगत या आधुनिक पद्धतीचा व तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी जीवन सोपे करण्यावर आपण भर दिला पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले आहे.

  यावेळी उद्घाटन सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी संशोधनासारख्या विषयावर आयोजित या चर्चासत्राच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतुन नवनिर्माण साकार होण्यास मदत होणार असल्याचे म्हटले आहे.याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व संशोधनपुरक दृष्टिकोण वाढीसाठी महाविद्यालय सदैव कटिबध्द असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.

   सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात उपस्थितांचे स्वागत करतांनाच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनासारखे विषय समाविष्ट असल्याने या संशोधन सेमिनारचा फायदा महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना होईल असा आशावाद व्यक्त केला.या सेमिनारच्या निमित्ताने आयोजक महाविद्यालय व इतर महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी लिहिलेल्या 68 शोध निबंध संशोधन पत्रिकेचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते  करण्यात आले आहे.

  यावेळी उद्घाटन सत्र कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या सेमिनारचे संयोजक डॉ.एस.जी.कोंडा यांनी या राज्यस्तरीय कार्यशाळेची भूमिका विशद केली तर उपस्थित मान्यवरांचा परिचय डॉ.निलेश पोटे यांनी करून दिला आहे.

  या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत डॉ.पी.बी.शेळके,डॉ.ए.एस. वाणी,डॉ.एस.एन.शेळके,डॉ.जी.जी.मंदावाड यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सत्रे संपन्न झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी तर आभार डॉ.गणेश शिंदे यांनी मानले आहे.या सेमिनारसाठी डॉ.बी.बी.भोसले,डॉ.बी.एस.गायकवाड़, डॉ.एन.आर.दळवी,डॉ.बी.डी.गव्हाणे,डॉ.एन.जी.शिंदे,डॉ.एन.टी.ढोकळे,प्रा.एस.एस.नागरे, डॉ.आर.बी.तलवारे,डॉ.एम.बी.खोसे,डॉ.एस.एम.देवरे,महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे आदींनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close