शैक्षणिक
…या महाविद्यालयाला,’ ए.प्लस ‘ मानांकन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत झालेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मूल्यांकनात स्थानिक के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाला ए.प्लस श्रेणी प्राप्त झाली असून ही श्रेणी प्राप्त करणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय ठरले आहे असल्याचा दावा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी केला असून या महाविद्यालयाचे आणि प्रशासनाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नॅक (नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन कौन्सिल) कडून महाविद्यालयाला मिळणारे ‘ए प्लस’ (A+) मानांकन हे उच्च शैक्षणिक गुणवत्ता,उत्तम पायाभूत सुविधा,अनुभवी शिक्षक आणि उत्कृष्ट संशोधन कार्याचे प्रतीक आहे.हे मानांकन ३.२६ ते ३.५० सीजीपीए (CGPA) असलेल्या संस्थांना दिले जाते,ज्यामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढते विद्यार्थ्यांचा त्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपोआप कल वाढतो.त्यासाठी आगामी काळात के.जे.सोमैया कनिष्ठ महाविद्यालयात अग्रणी ठरणार आहे.
नॅकचे मुख्यलय बंगळुरू येथे आहे.देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी केली गेली.नॅकच्या आदेशामध्ये देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या कामगिरीचे मूल्यमापन,मूल्यांकन आणि मान्यता देण्याचे कार्य समाविष्ट आहे.नॅकचे तत्वज्ञान दंडात्मक किंवा निर्णयात्मक असण्याऐवजी वस्तुनिष्ठ आणि निरंतर सुधारणेवर आधारित असल्याचे मानले जाते,जेणेकरून उच्च शिक्षणाच्या सर्व संस्थांना त्यांची संसाधने,संधी आणि क्षमता जास्तीत जास्त वाढवण्याचा अधिकार मिळू शकेल.मूल्यांकन हे संस्था किंवा तिच्या युनिट्सचे कार्यप्रदर्शन मूल्यमापन आहे आणि परिभाषित निकष वापरून स्वयं-अभ्यास आणि समवयस्क पुनरावलोकनावर आधारित प्रक्रियेद्वारे पूर्ण केले जाते.मान्यता म्हणजे नॅकद्वारे दिलेले प्रमाणपत्र जे पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध मानले जाते.सध्या नॅकद्वारे मूल्यांकन आणि मान्यता ऐच्छिक आधारावर केली जाते.नॅक मान्यता म्हणजे दिलेले प्रमाणपत्र जे पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.सध्या महाविद्यालय व विद्यापीठ यांचे मूल्यांकन आणि मान्यता ऐच्छिक आधारावर केली जाते.

याविषयी अधिक माहिती देताना के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे म्हणाले की “बाह्य मूल्यांकनासाठी आलेल्या समितीने महाविद्यालयात राबविले जाणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम,पायाभूत सुविधा,अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा,कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक प्रयोगशाळा,विविध कोर्सेस, विद्यार्थी संख्या,अध्यापनातील नवीन तंत्रज्ञानाचा विपुल वापर,विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात सुसज्ज सी.सी.टी.व्ही.यंत्रणा तसेच सुरक्षा रक्षकांचे योग्य नियोजन,भव्य क्रीडांगण,सुसज्ज ग्रंथालय आदी बाबींचा विचार करूनच समितीने ए.प्लस सर्वोच्च श्रेणी प्रदान केली असल्याने संस्था व महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे.या पूर्वी या संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयाला ए.प्लस हे मानांकन मिळाले आहे.
महाविद्यालयाच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालक तसेच कोपरगाव परिसरातील नागरिकांनी देखील आनंद व्यक्त केला असून महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.महाविद्यालयाच्या या यशामागे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे,कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे, अध्यापक वृंदआदींचे परिश्रम दडलेले आहेत.तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन,योग्य शिक्षण,शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिलेले प्राधान्य यामुळे महाविद्यालयाने ही कामगिरी साध्य केल्याबद्दल पालकानी समाधान व्यक्त केले आहे.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालय प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.



