जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगाव तालुक्यातील…या संस्थेचा खाजगी कंपनीशी करार!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव हद्दीतील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाने नुकतीच नासिक येथील प्रसिद्ध सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; कंपनीला औद्योगिक भेट दिली असून या भेटीदरम्यान गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य वसीम शेख यांनी दिली आहे.

गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाने नुकतीच नासिक येथील प्रसिद्ध सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; कंपनीला औद्योगिक भेट दिली आहे.

  

   “विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीतील आधुनिक तंत्रज्ञान,प्रत्यक्ष प्रोजेक्ट व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट याबाबतचे ज्ञान मिळणार असून त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.करारानुसार विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग,इंटर्नशिप तसेच प्लेसमेंटसाठी या कंपनीकडून प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे”-प्राचार्य वसीम शेख,गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट.

   भारतातील महाविद्यालयांचे परदेशी शैक्षणिक संस्थांशी होणारे करार (एम.ओ.यू.) मुख्यत्वे संयुक्त संशोधन,विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान,आणि ‘ट्विनिंग प्रोग्राम्स’द्वारे जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यावर केंद्रित आहेत.यूजीसीच्या २०२३ च्या नियमांनुसार,नामांकित विदेशी विद्यापीठे भारतात कॅम्पस स्थापन करू शकतात,ज्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान,ए.आय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षणात थेट परकीय भागीदारी वाढली आहे.त्यामुळे विद्यार्थी काही काळ भारतीय संस्थेत आणि काही काळ परदेशी विद्यापीठात शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवू शकतात.यामुळे विद्यार्थी शिक्षण क्रेडिट्स न गमावता सहजपणे एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत जाऊ शकतात,ज्याला विद्यार्थी सुलभ हस्तांतरण म्हणतात.त्यातून विद्यार्थ्यांना भारतीय विज्ञान संस्था सारख्या संस्था संयुक्त पी.एच.डी.कार्यक्रम आणि परदेशी विद्यापीठांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प  राबविण्यास मदत होत आहे.असाच करार नुकताच सुरेगाव हद्दीतील गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटने देशातील सुनंदा इन्फोटेक प्रा.ली.कंपनीशी केला आहे.

   यावेळी सुनंदा इन्फोटेक प्रा.लि;मॅनेजर सिद्धार्थ मांडवडे यांनी विद्यार्थ्यांना कंपनीच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली तसेच भविष्यातील सहकार्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.या कार्यक्रमाला संस्थेचे निरीक्षक प्रा.नारायण बारे,कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे,कॉम्प्युटर विभागाचे विभागप्रमुख,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.

  दरम्यान या सामंजस्य कराराबाबत अधिक माहिती देतांना प्राचार्य वसीम शेख यांनी सांगितले की,”विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीतील आधुनिक तंत्रज्ञान,प्रत्यक्ष प्रोजेक्ट व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट याबाबतचे ज्ञान मिळणार असून त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.करारानुसार विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग,इंटर्नशिप तसेच प्लेसमेंटसाठी या कंपनीकडून प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.तसेच विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी,प्रोजेक्ट वर्क आणि इंडस्ट्री स्टँडर्ड वर्क कल्चर याबाबत कंपनीच्या तज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार असून त्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे.

   यावेळी “विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता,इंडस्ट्रीशी थेट जोडणे ही काळाची गरज आहे.संस्थेच्या मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा औद्योगिक भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान,प्रत्यक्ष अनुभव आणि करिअरच्या जास्तीत जास्त संधी कशा उपलब्ध होतील यासाठी महाविद्यालय प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती प्राचार्य वसीम शेख यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close