जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगाव तालुक्यातील शैक्षणिक संस्थेचा जागतिक संस्थेची करार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि नाशिक येथील जागतिक दर्जाची कंपनी निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात करण्यात आला आहे.यामुळे गौतम पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य वसीम शेख यांनी आमच्या प्रतिंनिधीस दिली आहे.

  

दरम्यान हा सामंजस्य करार झाल्यामुळे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपनीत जाऊन इंडस्ट्रियल व्हिजिट करता येणार आहे.तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच कंपनीत थेट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

   या करारामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचे धडे गिरवण्यासोबतच रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ही कंपनी इलेक्ट्रिकल पॅनल निर्मिती आणि सीएनसी ऑपरेशन्समध्ये जागतिक स्तरावर कार्यरत आहे.या करारातून तृतीय वर्षाच्या पात्र विद्यार्थ्यांना नोकरी मध्ये प्राधान्य देण्यात येणार असून द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना तीन महिने इंडस्ट्रियल ट्रेनिंग दिली जाणार आहे.जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञान याबाबत विद्यार्थ्यांना अपडेट करण्यासाठी कंपनीच्या तज्ञ मंडळींकडून गौतम पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.त्यामुळे स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी मोठी संधी संस्थेच्या सचिव चैताली काळे यांनी उपलब्ध करून दिली असल्याची त्यांनी सांगितले आहे.

  दरम्यान हा सामंजस्य करार झाल्यामुळे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपनीत जाऊन इंडस्ट्रियल व्हिजिट करता येणार आहे.तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच कंपनीत थेट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.सध्या उद्योग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत.या पार्श्वभूमीवर देशातील इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग व सीएनसी ऑपरेशन प्रोडक्शन आणि मेंटेनन्स क्षेत्रामध्ये मध्ये गौतम पॉलीटेक्निकचे विद्यार्थी पुढे असतील असा विश्वास प्राचार्य वासिम शेख यांनी व्यक्त केला.

   दरम्यान यावेळी संस्थेचे निरीक्षक प्रा.नारायण बारे,कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सागर गिरासे,कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे,मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाचे विभागप्रमुख,शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close