शैक्षणिक
सेवानिवृत प्राध्यापकांच्या संघटनेचे…या ठिकाणी अधिवेशन!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अखिल भारतीय सेवानिवृत्त विद्यापीठीय व महाविद्यालय अध्यापक संघटना यांच्यातर्फे दरवर्षी उच्च शिक्षण क्षेत्राशी दरवर्षी उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विषयावर राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत असते.या वर्षी “AIFRUCTO राष्ट्रीय अधिवेशन २०२६” चे आयोजन दि.२७ व २८ जानेवारी रोजी सिद्धसंकल्प लॉन्स,शिर्डी येथे करण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष प्रा.मगन ताटे व संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.कान्हू गिरमकर यांनी दिली आहे.

दरम्यान या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन सतत दुष्काळग्रस्त असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘हिवरेबाजार’ या गावात अथक परिश्रम करून भूजल पुनर्भरण प्रयो यशस्वी करून भारतातील ग्राम विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून हिवरे बाजार या गावास नावलौकिक मिळवून देणारे समाजसेवक पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते या शिर्डी येथे होणार आहे.
“भारताच्या उच्च व तंत्रशिक्षणाचे भविष्य समस्या आणि आव्हाने” हा मुख्य विषय राष्ट्रीय अधिवेशनातील चर्चा सत्रासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयाच्या संदर्भात विख्यात शिक्षक तज्ञ व अर्थशास्त्रज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.देश व विदेशातून अधिवेशनासाठी उपस्थित राहणारे प्रमुख वक्ते व सहभागी सेवानिवृत्त प्राध्यापक हे डॉ.मुणगेकर यांनी मांडलेले विचार केंद्रभागी ठेवून विविध उप विषयांवर साधक बाधक चर्चा होणार आहेत.

दरम्यान यावेळी उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक नामवंत अभ्यासक व सेवानिवृत्त प्राध्यापक यांनी “भारताच्या उच्च व तंत्र शिक्षणाचे भविष्य,समस्या आणि आव्हाने” या मुख्य विषयावरील आणि उपविषयांवरील लेख संयोजन समितीकडे पाठविलेले आहेत.या लेखाचे संकलन असलेली एक स्मरणिका प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे.
दरम्यान या पत्रकार परिषदेत प्रा. व्यंकटेश व्होलेहोन्नूर, डॉ.रविंद्र कडू,डॉ.शामरा शामराव लवांडे आणि शरद कृ. पवार तसेच कोपरगांव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान विचार मंथनातून आलेले निष्कर्ष तसेच भारताच्या उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात भविष्य काळात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काय उपाय योजना करता येतील याबाबतचे लेखी निवेदन सेवानिवृत्त प्राध्यापक महासंघाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.सतत दुष्काळग्रस्त असलेले ‘हिवरेबाजार’ (जिल्हा अहिल्यानगर) या गावात अथक परिश्रम करून भूजल पुनर्भरण प्रयो यशस्वी करून भारतातील ग्राम विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून हिवरे बाजार या गावास नावलौकिक मिळवून देणारे समाजसेवक पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते या शिर्डी येथील राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.तसेच या सत्राचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक महासंघाचे सरचिटणीस डॉ.प्रवीण रघुवंशी असणार आहेत आणि राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष व नामवंत विचारवंत प्रा.सुभाष वारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथील राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप समारंभ संपन्न होणार आहे. यासाठी देशातील आणि राज्यातील सेवानिवृत प्राध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रा.मगन ताटे व संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.कान्हू गिरमकर कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी शेवटी केले आहे.



