जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शैक्षणिक संकुलात सांस्कृतिक सोहळा सुरू !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा’ सांस्कृतिक सोहळा’ मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे.”दि.२१ जानेवारी ते २६ जानेवारी ” या कालावधीत नृत्याविष्कार,संगीत महोत्सव,महानाट्य,बालनाट्य तसेच खाद्यपदार्थ मेळा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला आहे.

कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात सुरू झालेला सांस्कृतिक सोहळा.

    

कोकमठाण येथे सुरू झालेला बालनाट्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास सिनेअभिनेत्री”अपुर्वा चौधरी’ व ‘अमोल दोरुगडे’ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेले असे उपक्रम,ज्यात नृत्य,गायन,नाट्य,पोवाडे,चित्रकला,वादविवाद,लोककला आणि विविध सण-उत्सव साजरे करणे यांसारख्या कला सादर करण्याची संधी मिळते,ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो,सर्जनशीलता विकसित होते आणि भारतीय संस्कृती व विविध परंपरांची ओळख होते.हे कार्यक्रम विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देतात आणि शैक्षणिक विकासासोबतच सामाजिक व भावनिक कौशल्येही वाढवतात.असाच सांस्कृतिक महोत्सव कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जंगली महाराज ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलात संपन्न झाला आहे.विद्यार्थी उत्स्फूर्त सहभागातून सर्व कार्यक्रमांचा आनंद घेत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.बालनाट्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास सिनेअभिनेत्री”अपुर्वा चौधरी’ व ‘अमोल दोरुगडे’ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

  

दरम्यान दि.”२३ जानेवारी”रोजी सकाळी आत्मा मालिक मेळा उत्साहात संपन्न झाला आहे.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला.या मेळ्याचे उद्घाटन ‘जितेंद्र भोपळे’,संचालक नगर रचना,पुणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

   दरम्यान दि.”२२ जानेवारी” रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व संगीत महोत्सव भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी कोकणातील सुप्रसिद्ध गायक ‘ऋषी नार्वेकर’, कोपरगावचे पोलीस निरीक्षक ‘रामकृष्ण कुंभार’ व’संदीप कोळी’ आदी मान्यवर उपस्थित होते.

   दरम्यान दि.”२३ जानेवारी”रोजी सकाळी आत्मा मालिक मेळा उत्साहात संपन्न झाला आहे.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला.या मेळ्याचे उद्घाटन ‘जितेंद्र भोपळे’,संचालक नगर रचना,पुणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.आगामी कालावधीत भव्य पारितोषिक वितरण समारंभ तसेच ‘ज्योतिर्लिंग’ व ‘महाभारत’ ही महानाट्ये सादर होणार असून यामध्ये हजारो विद्यार्थी कलाकार म्हणून सहभाग घेणार आहेत.

   सदर कार्यक्रमांसाठी आत्मा मालिक ध्यानपीठाचे सद्गुरू माऊली,सर्व संत व संत माता,संस्थेचे अध्यक्ष ‘नंदकुमार सूर्यवंशी’,उपाध्यक्ष’ बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठल होन,प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी,शालेय व्यवस्थापक,सुधाकर मलिक,हिरामण कोल्हे,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,मीरा पटेल,सांस्कृतिक प्रमुख आत्मदर्शन बागडे,प्राचार्य निरंजन डांगे,माणिक जाधव,संदीप गायकवाड,नामदेव डांगे,मीना काकडे,नितीन सोनवणे व यांच्यासह शिक्षक,कर्मचारी व पालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close