शैक्षणिक
आरोग्यासह आपत्ती व्यवस्थापन,तंत्रज्ञानावर संशोधन गरजेचे-..आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी शिक्षणासह उद्योगाची सांगड घालत प्रयोगशील राहून शिक्षण,दीर्घ आयुष्य,आरोेग्य सेवा,आपत्ती व्यवस्थापन,तंत्रज्ञानआदी विषयांवर संशोधन करणे गरजेचे आहे.संशोधनाला बळकटी देण्यासाठी संजीवनी युनिर्व्हसिटीने उद्योगांशी समन्वय साधावा असे आवाहन हैद्राबाद स्थित सायंट या बहुराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बी.व्ही.आर.मोहन रेड्डी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

” संशोधनात जास्तीत जास्त प्रभावीपणा असणे गरजेचे आहे.संशोधनातुन शाश्वत विकास साधल्यामुळे गरीबी आणि भुक दुर होईल.जीवन सुलभ करण्यासाठी ज्ञानाचा वापर करा.एआय तंत्रज्ञानापर्यंत आपण पोहचलो आहोत,संशोधन समाजाला कसे उपयुक्त ठरेल याचा विचार सर्वांनी केला पाहीजे”-डॉ.अमरेंद्र पाणी.
कोपरगाव येथील संजीवनी युनिर्व्हसिटी आयोजीत ‘सस्टेनेबल इनोव्हेशन इन इंजिनिअरींग,सायन्स अँड मॅनेजमेंट’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.बी.व्ही.आर.मोहन रेड्डी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी युनिर्व्हसिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे हे होते.
सदर प्रसंगी संयुक्त संचालक-संशोधन संघटना,भारतीय विद्यापीठे,नवी दिल्लीचे डॉ.अमरेंद्र पाणी,टोकुशिमा युनिर्व्हसिटी जपानचे प्राद्यापक डॉ.पंकज कोईंकर,युनिर्व्हसिटी ऑफ ऑक्सफर्ड अँड कोर्स डायरेक्टर,इंग्लंडचे डॉ.अजित जावकर,युनिर्व्हसिटी ऑफ चेस्टर (यु.के.)चे डीन डॉ.अलेक्स फेन्टॉन,संजीवनी युनिर्व्हसिटीचे उपकुलगुरु डॉ. ए.जी.ठाकुर,डीन कविथा राणी,संशोधन संचालक डॉ.पी.विलिअम आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”हवामान आपत्ती हा एक महत्वाचा संशोधनाचा विषय आहे.तंत्रज्ञान हेच शाश्वत विकासासाठी पुरक ठरू शकते.राष्ट्र उभारणीत सहभागी होवुन उद्योजक बनून नोकऱ्या देणारे बना असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
यावेळी सव्हीकेएम एनएमआयएस ग्लोबल युनिर्व्हसिटीचे सल्लागार डॉ.माधव नारायण वेल्लींग म्हणाले की,” संशोधन ही काळाची गरज असुन ते नैतिदृष्ट्या कसे करतो,हे महत्वाचे आहे.यावेळी १० नवसंशोधकांचा शोध निबंधाबद्दल सत्कार करण्यात आला आहे.मान्यवरांच्या हस्ते ‘अमुर्त स्मरणिकेचे’ प्रकाशन झाले.या परीषदेमध्ये एकुण २५० रिसर्च पेपर्स सादर करण्यात आले होते.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
सदर प्रसंगी प्रास्तविक डॉ.कविथा राणी यांनी केले तर डॉ.पी.विलिअम यांनी उपस्थितांचे स्वागत डॉ.ठाकुर यांनी संजीवनी शैक्षणिक संकुलाचा प्रवास सांगताना संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांची दूरगामी कार्याचा वेध घेतला व त्या संदर्भात अध्यक्ष नितिन कोल्हे व अध्यक्ष अमित कोल्हे यांनी राबवलेल्या उपप्रमाचे कौतुक केले आहे. प्रा.डॉ.सुंधाशु भट यांची सुत्रसंचालन केले तर प्रबंधक प्रा.अमोल ढाकणे यांनी आभार मानले आहे.



