शैक्षणिक
या विद्यालयातील चित्रकला परीक्षेचा निकाल जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शासकिय चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे.इलेमेंटरी चित्रकला परीक्षेत शाळेतील एकूण ६९ विद्यार्थी व इंटरमीजीएट परीक्षेस १०० विदयार्थी प्रविष्ठ झाले होते.या परीक्षेत एकूण १६९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे.

शासकिय चित्रकला परीक्षेत कोळपेवाडी केंद्रातून व तालुक्यातून गौतम पब्लिक स्कूलने इतर शाळांच्या तुलनेत निकालाची पंरपरा राखलेली आहे.सध्याच्या युगात करिअर करण्याच्या सर्वाधीक संधी कला क्षेत्रात उपलब्ध आहेत.
दरम्यान शाळेचा इलेमेंटरी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेत १९ विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर २४ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे. इंटरमीजीएट परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेत ४४ विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर ३१ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाडविश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे,संस्थेचे निरीक्षक नारायण बारे व सर्व संस्था सदस्य आदींनी अभिनंदन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण, माध्यमिक पर्यवेक्षक ज्योती शेलार आदींचे मार्गदर्शन लाभले.



