शैक्षणिक
तंत्रशिक्षण महाविद्यालयाचा निकाल जाहीर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने हिवाळी परीक्षा २०२५ पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

दरम्यान तृतीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ९८% एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागात प्रथम जाधव संकेत ७९.४१%, द्वितीय क्रमांक कु.भोसले साक्षी ७८.९४%,तृतीय क्रमांक वहाडणे ओमप्रकाश ७८.८२%, गुण मिळवून पटकावला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या महाविद्यालयाचा शेकडा निकाल ९७% एवढा लागला असून महाविद्यालयात कु.बढे अनुष्का ८९.७७% गुण मिळवून प्रथम,कु.घारे अपूर्वा ८८.५९% गुण मिळवून द्वितीय,कु.गुडघे समृद्धी हिने ८७.४१% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले असून प्रथम वर्षाचा एकूण शेकडा निकाल ९९% एवढा लागला असून प्रथम कु.बढे अनुष्का ८९.७७%, द्वितीय वाघडकर अभिजित ८५.०६%, तर पाचोरे सार्थक या विद्यार्थ्याने ७९.८८% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
दरम्यान द्वितीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ९६% एवढा लागला असून यामध्ये मेकॅनिकल विभागात प्रथम क्रमांक घुले हर्ष ७६.४४ %, द्वितीय शिंदे प्रवीण ७५.७८%, तृतीय लासुरे मोहनीश ७३%, द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम कु. ठोंबरे सायली ७८.३५%, द्वितीय कु. ठोंबरे अनुजा ७६.३५%, तृतीय कु. चिने निकिता ७५%, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम कु.महाजन इशा ८४.३५%, द्वितीय कु.अबक प्रतीक्षा ८०.९४%, तृतीय कु. गायकवाड शिवानी ७९.६५%, द्वितीय वर्ष सिव्हिल विभागात प्रथम काळे सृष्टी ७९.८८%, द्वितीय कु.सुरासे समीक्षा ७९.५३%, तृतीय पानगव्हाणे यश किशोर ७९.१८% गुण मिळवून आदींनी बाजी मारली आहे.
दरम्यान तृतीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ९८% एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागात प्रथम जाधव संकेत ७९.४१%, द्वितीय क्रमांक कु.भोसले साक्षी ७८.९४%,तृतीय क्रमांक वहाडणे ओमप्रकाश ७८.८२%, तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम मुरडणार अरुण ७८.३५%, द्वितीय डोलणार राहुल ७७.६५%, तृतीय क्रमांक कु.गवांदे पूजा ७३.४१%, तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम कु. घारे अपूर्वा ८८.५९ %, द्वितीय कु. गुडघे समृद्धी ८७.४१%, तृतीय कु. गोरे श्रुष्टी ८५.५३%, सिव्हिल विभागात प्रथम क्रमांक थोरात राहुल ७८.३३ % द्वितीय जाधव यशराज ७६.७८%, तृतीय कुंभार्डे प्रथमेश ७६ % गुण मिळविले आहे.
दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,संस्थेचे विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,संस्थेचे निरीक्षक प्रा.नारायण बारे,प्राचार्य वसिम शेख,कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे आदींनी अभिनंदन केले आहे.



