जाहिरात-9423439946
शैक्षणिक

इतर शाळांत वळणारा विद्यार्थी आता जि.प.शाळेत- प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी) 

   जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर शाळांप्रमाणेच समान संधी उपलब्ध होत असून आवश्यक शैक्षणिक सोयी-सुविधा मिळाल्यामुळे पूर्वी खासगी किंवा इतर शाळांकडे वळणारा विद्यार्थी आता जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहे.यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच माहेगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

 

“शाळा चांगली असेल तरच शिक्षण टिकणार आहे.म्हणूनच रस्ते आणि शिक्षण या विकासाच्या दोन वेगवेगळ्या नव्हे तर एकमेकांशी घट्ट जोडलेल्या बाजू आहेत.याच विचारातून मतदार संघात रस्ते आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत एकाच वेळी ठोस कामे केली आहेत”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

    कोपरगाव मतदार संघातील माहेगाव देशमुख येथे सचिन खर्डे घर ते ग्रा.मा.१०१ रस्ता करणे (५० लाख),जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ०३ खोल्या बांधणे (३६ लाख) या एकूण ८६ लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ०२ खोल्या (२४ लाख) या कामाचे लोकार्पण आ.काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.

माहेगाव देशमुख येथे रस्ता व शाळा खोल्यांच्या भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी आ.आशुतोष काळे समवेत मान्यवर.

   सदर प्रसंगी माहेगाव देशमुख ग्रामपंचायतच्या सरपंच,उपसरपंच,सदस्य व सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक मंडळ,श्री अमृतेश्वर महादेव मंदिर,श्री दत्तदिगंबर देवस्थान व श्री मारुती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त,विविध क्षेत्रातील मान्यवर व माहेगाव देशमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

      त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”माहेगाव देशमुखच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जुन्या खोल्या जीर्ण झाल्यामुळे दोन नव्या खोल्यांसाठी मंजूर करून आणलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या शाळा खोल्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात तसेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी आणखी तीन नव्या खोल्यांसाठी निधी आणला असून त्या खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले असून या खोल्यांचे कामही चांगल्या पद्धतीने लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.या निधीतून रस्ते,वीज,पाणी,आरोग्य अशा विकासाच्या मुलभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.रस्ते व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत समांतर विकास साधण्यात यश आले असून ही विकासदृष्टी केवळ आजच्या पिढीपुरती मर्यादित नसून पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया घालणारी आहे.विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार रस्ते उपलब्ध असतील तरच विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुरक्षित,सुलभ आणि वेळेत होणार आहे.शाळा चांगली असेल तरच शिक्षण टिकणार आहे.म्हणूनच रस्ते आणि शिक्षण या विकासाच्या दोन वेगवेगळ्या नव्हे तर एकमेकांशी घट्ट जोडलेल्या बाजू आहेत.याच विचारातून मतदार संघात रस्ते आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत एकाच वेळी ठोस कामे केली आहेत.माहेगाव देशमुख येथे सुरू होणारे रस्त्यांचे काम आणि शाळा खोल्यांचे बांधकाम हे केवळ स्वतंत्र प्रकल्प नसून,समग्र विकासाच्या दृष्टीने आखलेले पाऊल आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होतील असा विश्वास आ.काळे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close