शैक्षणिक
…या महाविद्यालयाची विद्यार्थिनी राष्ट्रीय निबंध स्पर्धेत प्रथम !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय येथे झालेल्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेत स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.कोमल केकाण हीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे,अशी माहिती प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी येथे दिली आहे.तिच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शहापूर येथील महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत आयोजित राष्ट्रीय निबंध स्पर्धेत कु.कोमल केकाणच्या ‘नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण :जागतिक समस्या व आव्हाने’ या विषयावरील मराठी माध्यमातील निबंधाला तीनही माध्यमातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु. ०४ हजार,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.
यावेळी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे व वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ.जिभाऊ मोरे उपस्थित होते.
दरम्यान याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ.जिभाऊ मोरे म्हणाले की,”उपरोक्त महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत आयोजित राष्ट्रीय निबंध स्पर्धेत कु.कोमल केकाणच्या ‘नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण :जागतिक समस्या व आव्हाने’ या विषयावरील मराठी माध्यमातील निबंधाला तीनही माध्यमातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु. ०४ हजार,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र एका समारंभात ज्ञानवर्धिनी ट्रस्ट विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष किशोर कुडव व कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांच्या शुभहस्ते आणि प्राचार्य अनिलकुमार सिंह यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले आहे.”
कु.केकाण हिने यापूर्वी देखील अशा अनेक निबंध स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त केली आहेत.कु.केकाण हिला प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,डॉ.जिभाऊ मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.कु.केकाणच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदीप रोहमारे,सचिव अॅड.संजीव कुलकर्णी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.



