शैक्षणिक
…या शिक्षकाची तालुका क्रीडा अधिकारी निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील क्रीडा क्षेत्रात सातत्याने क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणारे क्रीडा शिक्षक शिवप्रसाद प्रकाश घोडके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तालुका क्रीडा अधिकारी गट ‘ब‘ राजपत्रीत ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण नाशिक विभागात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.कोपरगांव तालुक्यातील ते पहिले तालुका क्रीडा अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला आहे.

शिवप्रसाद घोडके यांचे व्हाॅलीबाॅल,टेबल टेनिस,तलवारबाजी,थ्रो बाॅल यासह अनेक क्रीडा प्रकारात नैपुण्य असल्याचे समजले जाते.त्यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार अहिल्यानगर,जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,नाशिक येथील युवा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे.तसेच महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके यांचे ते पुतणे आहेत.
शिवप्रसाद घोडके यांचे वडील प्रकाश घोडके हे खाजगी नोकरी करुन निवृत्त असून आई अर्चना गृहिणी आहे.शिवप्रसाद यांचे शालेय शिक्षण श्रीमान गोकुळचंद विद्यालय, कोपरगांव येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण एस.एस.जी.एम.महाविद्यालय,कोपरगांव येथे झाले आहे.प्रवरा शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्रवरानगर,लोणी येथे क्रीडा शिक्षकाची पदवी संपादन केली आहे.
राहाता येथील साध्वी प्रितीसुधाजी इंग्लिश मिडिअम स्कूल (डांगे पॅटर्न अंतर्गत) येथे सुरुवातीला क्रीडा शिक्षक म्हणून काम केले असून त्या नंतर संत जनार्दन स्वामी महर्षी विद्या मंदिर,कोकमठाण ता. कोपरगांव येथे क्रीडा शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम केले आहे.
त्यांचे व्हाॅलीबाॅल,टेबल टेनिस,तलवारबाजी,थ्रो बाॅल यासह अनेक क्रीडा प्रकारात नैपुण्य असल्याचे समजले जाते.त्यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार अहिल्यानगर,जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,नाशिक येथील युवा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे.तसेच महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके यांचे ते पुतणे असून महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांचे बंधू आहेत.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.