शैक्षणिक
…या शाळेत शैक्षिणक साहित्याचे वाटप

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील वाघिनाला येथील जिल्हा परिषद शाळेत ज्ञानेश्वर कोरडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील सहयगिरी शैक्षणिक संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मोठया उत्साहात करण्यात आले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शैक्षणिक साहित्याचे वाटप हे गरजू विद्यार्थ्यांना वह्या,दप्तर आणि इतर आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि मंडळे करतात.हे उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने राबवले जातात.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील वाघीनाला शाळेत हा उपक्रम संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी उपसरपंच विवेक परजणे,माजी केंद्र प्रमुख दिलीप ढेपले,शिक्षण तज्ञ संभाजी भोसले,उपध्यापक ज्ञानेश्वर कोरडे,पोलिस पाटील श्री.आचारी,प्रदीप भानगुडे,चारुदत्त गायकवाड,सुजित नीलक,मुख्याध्यापक सारिका दैने,श्रीराम भोर आदी मान्यवर उपस्थित होते.