शैक्षणिक
भारताचे संविधान सर्वोच्च -ॲड.लोढा यांचे प्रतिपादन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
“भारताचे संविधान सर्वोच्च असून संविधानामुळे विविध समाजहिताचे कायदे पारित केले जातात रूढी-परंपरांमधूनच कायद्याचा उगम झाला असून समाजाने गुण्यागोविंदाने जगावे यासाठी कायदे करण्यात आले असल्याचे प्रतिपादन ॲड.मेधा लोढा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

राजस्थान मधील भवरीदेवी यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा प्रसंग कथन केला तसेच विशाखा गाईडलाईन २०१३ चा महिलांच्या संदर्भातील कायदा, त्याचबरोबर महिलांच्या संदर्भातील विविध कायद्यांची माहिती ॲड.लोढा यांनी दिली आहे.
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयात अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या विद्यमाने “तुमचे हक्क जाणून घ्या : लैंगिक छळाविरुद्ध कायदेशीर संरक्षण” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानसत्रात ॲड्.लोढा बोलत होत्या.

सदर कार्यक्रमास लेफ्टनंट वर्षा आहेर,प्रा.विभुते,प्रा.गुडघे,प्रा.खंडीजोड, प्रा.जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्यांनी राजस्थान मधील भवरीदेवी यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा प्रसंग कथन केला तसेच विशाखा गाईडलाईन २०१३ चा महिलांच्या संदर्भातील कायदा, त्याचबरोबर महिलांच्या संदर्भातील विविध कायद्यांची अभ्यासपूर्ण माहितीही दिली आहे.
यावेळी प्राचार्य डॉ.विजय ठाणगे सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तर समिती प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी प्रास्ताविक केले तर प्रा.मयुरी आहेर यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी उपस्थितांचे आभार डॉ.नीता शिंदे यांनी मानले आहे.