शैक्षणिक
…हे सरकारी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शाळा आणि अभियांत्रिकी प्रवेश सुरु झाले असून त्यासाठी जातपडताळणी वैधता प्रमाणपत्रासह विविध दाखले आवश्यक असताना नगर येथील जातपडताळणी कार्यालय ते वेळेवर देत नसल्याने सदरचे कार्यालय असून अडचण नसून खोळंबा ठरले असल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली आहे.

“कोपरगाव येथील एका विद्यालयाने काही वर्षांपूर्वी मराठा जातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू-मराठा लिहिण्याऐवजी हिंदू ‘अमागास’ असा विशेष पठडीतील उल्लेख करण्याचा भीम पराक्रम केल्याने पालकांना जातीचा दाखला व पडताळणी करताना सरकारी कार्यालये ‘ कागदपत्रांमध्ये मराठा उल्लेख नाही’ अशी त्रुटी काढून सदर प्रकरण फेटाळत आहे.त्यामुळे असा उल्लेख करणाऱ्या शाळा कर्मचाऱ्याचा विशेष सत्कार करण्याची वेळ आल्याचे पालकामधून बोलले जात आहे”
मराठा समाजाला (इ.डब्ल्यू.एस.) मध्ये आरक्षण मिळू शकते,परंतु यासाठी काही अटी व शर्ती आहेत. (इ.डब्ल्यू.एस.)हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण आहे आणि मराठा समाजातील जे नागरिक ( इ.डब्ल्यू.एस.)चे निकष पूर्ण करतात,त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळू शकते.ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे ५ एकरपेक्षा कमी जमीन आहे,तसेच ज्यांचे घर १६०० स्क्वेअर फुटांपेक्षा मोठे नाही,अशा लोकांन यात आरक्षण मिळते.वर्तमानात शाळा,महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू असून आपल्याला शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.मागील वर्षापासून कमी उत्पक्ष गटात ईडब्ल्यूएसमध्ये मराठा समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला राज्य सरकारने १० टक्के स्वतंत्र शैक्षणिक आरक्षण अभियांत्रिकी शिक्षणात दिले आहे.परंतु त्यासाठी जातीचा दाखला जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

” आपण मराठा एस.ई.बी.सी.जातीच्या वैधतेसाठी ४ महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे.पण तो अद्यापही प्रलंबित आहे.काही दिवसांत मुलाचा अभियांत्रिकी प्रवेश सुरू होतोय आणि वैधता प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे.अहिल्यानगर जात पडताळणी कार्यालयात विचारणा केली असता प्रकरण प्रलंबित आहे,ते लवकरच होईल,मात्र ‘ लवकर’ या संज्ञेत किती दिवस याचा उल्लेख नसल्याने जात पडताळणी कार्यालय विद्यार्थी आणि पालकांना पिळवणूक करण्याचे ठिकाण ठरले आहे”- संजय भवर,पालक कोपरगाव.
पूर्वी मराठा समाजाला जात प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यकता नसल्याने या बहुतांश मराठा बांधवानी जात पडताळणी केलेली नाही.परंतु अभियांत्रिकी प्रवेशाच्या वेळी आवश्यक कागदपत्राच्या यादीमध्ये जात प्रमाणपत्र व पडताळणी आवश्यक केले आहे.जात प्रमाणपत्र काढताना कोपरगाव शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या चुकीमुळे अनेक मराठा बांधवांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.या विद्यालयाने काही वर्षांपूर्वी मराठा जातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू मराठा लिहिण्याऐवजी हिंदू ‘ अमागास’ असा विशेष पठडीतील उल्लेख करण्याचा पराक्रम केल्याने केल्यामुळे जातीचा दाखला व पडताळणी करताना सरकारी कार्यालये कागदपत्रांमध्ये मराठा उल्लेख नाही अशी त्रुटी काढत आहेत.त्यामुळे पालकांना ४ महिने उलटूनही जात प्रमाणपत्र मिळत नाही.ज्याना जात यांनी ८ जुलै रोजी सभागृहात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेले नाही.त्यांना पावती सादर करून प्रवेश दिला जाईल,अशी घोषणा संबंधित मंत्र्यांनी केली.परंतु सदरचा शासन आदेश महाविद्यालयांना प्राप्त न झाल्याने महाविद्यालय विद्यार्थ्यांना मागणी करत असल्याने मराठा पालक चिंतेत आहेत.तरी शासनाने याची दखल घेऊन यावर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी कोपरगाव शहरातील पालक करत आहे.त्यामुळे संबंधित ज्या कर्मचाऱ्याने ,’अमागास ‘ शब्दाचा शोध लावला त्या कर्मचाऱ्यास विशेष पुरस्काराने गौरविण्याची वेळ आली असल्याची चर्चा पालक आणि विद्यार्थ्यात सुरू झाली आहे.