जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या विद्यालयात युथ डेवलपमेंट कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत युथ डेवलपमेंट कार्यक्रम विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष कुदळे हे होते.

  

“युवा वर्गाला लोकसंख्याशास्रीय लाभांशाला पाया समजून त्यावर मजबूत उभारणी करणं अत्यावश्यक आहे,कारण हा युवा वर्गच देशाचा चेहरा,ताकद आणि भविष्य असणार आहे.दुर्दैवाने आपल्याकडे युवांच्या विकसनासाठी फारसे काही केले जात नाही आहे.शासन व खासगी क्षेत्राचा युवांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निव्वळ मतदार वा संभाव्य ग्राहक यापुरता सीमित असतो.सामाजिक क्षेत्रातदेखील बहुतांश वेळा ‘यूथ डेव्हलपमेंट’ हा तुलनेने गौण महत्त्वाचा विषय मानला जातो.त्यामुळे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे”- बी.के.कोल्हे,उपमुख्याध्यापक,के.बी.पी.विद्यालय कोपरगाव.

   भारताची २२ % लोकसंख्या ही ‘युवा’ (वय १८ – २९ वर्षे) या गटात आहे.आवाका समजून घ्यायचा तर भारताचे हे २६ कोटी युवा हे आख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहेत.या लोकसंख्याशास्रीय लाभांशाला (डेमोग्राफिक डिव्हिडंड) पाया समजून त्यावर मजबूत उभारणी करणं अत्यावश्यक आहे,कारण हा युवा वर्गच देशाचा चेहरा,ताकद आणि भविष्य असणार आहे.दुर्दैवाने आपल्याकडे युवांच्या विकसनासाठी फारसे काही केले जात नाही आहे.शासन व खासगी क्षेत्राचा युवांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निव्वळ मतदार वा संभाव्य ग्राहक यापुरता सीमित असतो.सामाजिक क्षेत्रातदेखील बहुतांश वेळा ‘यूथ डेव्हलपमेंट’ हा तुलनेने गौण महत्त्वाचा विषय मानला जातो.युवांच्या विकासासाठी आपल्याकडे फारसे जोमदार उपक्रम तर नाहीतच;पण अत्यंत महत्त्वाची एक समस्या म्हणजे यासाठीचे कुठलेही सिद्धांत वा प्रारूपदेखील भारतात नाही. त्यामुळे एखाद्या युवाचा सुयोग्य विकास करायचा किंवा व्हायला हवा म्हणजे नेमकं काय करायचं,तरुणाचा विकास होतो आहे किंवा नाही,त्याची विविधांगी सक्षम जडणघडण होते आहे की नाही,हे कसे ओळखायचे याबाबत अस्पष्टता राहाते.त्यामुळे शासनाने विविध प्रकल्पाअंतर्गत हा कार्यक्रम सुरू केला आहे.त्याचा प्रारंभ नुकताच कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडला आहे.
    सदर प्रसंगी वक्ते निनाद ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे.त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव कथन करत आत्मविश्वास,योग्य तयारी आणि करिअर निवडीसंबंधी दिशा दिली.संवादात्मक शैलीत विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करत निर्णयक्षमता व मनोबल कसे वाढवावे,याविषयी मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक लव्हाटे सर यांनी  विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स विषयी बहुमोल मार्गदर्शन केले आहे.

  सदर कार्यक्रमास स्मिता कुदळे,दिनार कुदळे,उपमुख्याध्यापक बी.के.कोल्हे,पर्यवेक्षिका श्रीमती के.एफ.जगताप तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंकेयांचीही उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना दिनेश चव्हाण यांनी  केली आभार प्रदर्शन बी.आर.जाधव  यांनी केले आहे.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असल्याची माहिती उपमुख्याध्यापक बी.के.कोल्हे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close