जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

लक्षवेधी यशाबद्दल…या विद्यार्थिनीचा गौरव !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयातील कु.सुवर्णा सोमनाथ काळण हिने इयत्ता दहावीच्या (एसएससी बोर्ड) परीक्षेत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून संपूर्ण राज्यात मुला-मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिच्या या यशाचा गौरव कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे  मुख्याध्यापक  काशिनाथ लव्हाटे होते.

दरम्यान तिच्या या यशामागे सुवर्णाच्या चिकाटीचा अभ्यास,सातत्यपूर्ण प्रयत्न,तिच्या आईचे मोलाचे पाठबळ आणि शिक्षिका सुनिता वाबळे यांचे शिस्तबद्ध मार्गदर्शन हे प्रमुख कारण ठरले.

  दरम्यान तिच्या या यशामागे सुवर्णाच्या चिकाटीचा अभ्यास,सातत्यपूर्ण प्रयत्न,तिच्या आईचे मोलाचे पाठबळ आणि शिक्षिका सुनिता वाबळे यांचे शिस्तबद्ध मार्गदर्शन हे प्रमुख कारण ठरले.त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास,स्वप्नपूर्ती,मेहनत व नियोजनाचे महत्त्व पटवून दिले.वाबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आणि सुवर्णाच्या यशातून प्रेरणा घ्यावी असे सांगितले.

   या गौरव सोहळ्यास विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक कोल्हे बी. के.पर्यवेक्षिका श्रीमती जगताप याही उपस्थित होत्या.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोटे एस बी यांनी केले आहे.तसेच विद्यालयाच्या वतीने कुमारी सुवर्णा आणि मार्गदर्शक वाबळे मॅडम यांचे अभिनंदन तसेच,कु.सुवर्णा काळण हिला पुढील वाटचालीस विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close