शैक्षणिक
…या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निकालापूर्वी निवड !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्षातील १०८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तृतीय वर्षातील १०८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांनी नोकरीसाठी निवड केली आहे.यामध्ये बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीत ११ विद्यार्थी,टाटा मोटर्स २३,कमिंस इंडिया ०५,भारत गेअर ०८,अभिराज मॅन पॉवर ०१,आय.एफ.बी.०२,कायनेटिक इंजीनीरिंग १३,इंडोसकुल्प ऑटोकॉम्प्स १२, व आकाश प्रेकिसिओन कॉम्पोनेटस मध्ये ३३ अशा एकूण १०८ विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेच्या निकालापूर्वीच कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटमध्ये सातत्याने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जात असून त्या माध्यमातून दरवर्षी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळत आहे.या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तृतीय वर्षातील १०८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांनी नोकरीसाठी निवड केली आहे.यामध्ये बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीत ११ विद्यार्थी,टाटा मोटर्स २३,कमिंस इंडिया ०५,भारत गेअर ०८,अभिराज मॅन पॉवर ०१,आय.एफ.बी.०२,कायनेटिक इंजीनीरिंग १३,इंडोसकुल्प ऑटोकॉम्प्स १२, व आकाश प्रेकिसिओन कॉम्पोनेटस मध्ये ३३ अशा एकूण १०८ विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेच्या निकालापूर्वीच कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे.
दरवर्षी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्याना निकालापूर्वीच नामांकित कंपन्या नोकरीत सामावून घेतले जात आहे.महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर व सर्व सुविधायुक्त असलेली महाविद्यालयाची सुसज्य इमारत तसेच सुसज्ज वर्कशॉप,प्रयोगशाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी गौतम पॉलिटेकनिक इंस्टीट्युटकडे ओढा असतो.
गौतम पॉलिटेकनिक इंस्टीट्युटच्या माध्यमातून अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याबरोबरच अभियंता झाल्याची पदवी हातात पडत नाही त्यापूर्वीच महाविद्यालयाच्या प्रयत्नातून नोकरीचे देखील स्वप्न साकार होत आहे.त्यामुळे गौतम पॉलिटेकनिक इंस्टीट्युट मध्ये प्रवेश घेवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शासकीय नोकरीत तसेच बहुसंख्य नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत असून त्यामध्ये अजून १०८ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,सहसचिव स्नेहलता शिंदे,मानद सचिव चैताली काळे,संस्थेचे सर्व गव्हर्निंग कॉन्सलिंग सदस्य,प्रशासकीय अधिकारी प्रा.नारायण बारे,कार्यालयीन अधीक्षक आण्णासाहेब बढे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट अधिकारी प्रा.कैलास भोसले यांचे अभिनंदन केले आहे.