शैक्षणिक
…या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कंपनीत निवड !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षातील अकरा विद्यार्थ्यांची मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या, सारिगम येथे गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन विभागात निवड झाली आहे.या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

‘मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी’ही भारतातील एक अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनी आहे.गुजरात मधील सारिगम येथे आपले ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चालवते.हे केंद्र संशोधन,विकास आणि उत्पादन क्षमतांचे संवर्धन करण्यासाठी समर्पित आहे.
दरम्यान निवड झालेल्या या विद्यार्थ्यांत ऋषिकेश कोल्हे,हर्षद पावले,वैभव धगे,मयूर पैठणकर,प्रशांत सिनगर,आदित्य गांगुले,प्रसाद सप्ते,विवेक मते,रोहित बद्रे,वैष्णवी पाटील,ऋतुजा इंगळे,या विद्यार्थ्यांची मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत निवड झाली आहे.ही भारतातील एक अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनी आहे.गुजरात मधील सारिगम येथे आपले ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चालवते.हे केंद्र संशोधन,विकास आणि उत्पादन क्षमतांचे संवर्धन करण्यासाठी समर्पित आहे.जी गुणवत्तेच्या बाबतीत प्रसिद्ध आहे.कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन विभागात निवडलेले विद्यार्थी त्यांच्या कौशल्यांचा विकास करतील आणि औद्योगिक क्षेत्रात अनुभव मिळवतील.
दरम्यान या निवडीचे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,उद्योजक विजय कडू,इंजिनिअर दीपक कोटमे तसेच प्राचार्य डॉ.नितिन जैन,उपप्राचार्य उषा जैन,प्रा.डॉ.विजय जाधव, प्रा.डॉ.सचिन आगलावे,प्रा.करवीर आघाडे,प्रा.सुरज बेंद्रे,प्रा.दादासाहेब कावाडे व ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.रुद्रेश रत्नपारखे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.