शैक्षणिक
गणित विज्ञान प्रदर्शनात…या विद्यार्थिनीचे यश
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनात पहिली ते पाचवी गणित गटात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलची आयेशा अत्तार हिने प्रथम क्रमांक पटकावला व तसेच सहावी ते आठवी गणित गटात कृष्णांगी गायकवाड व साईश्री देवकर या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तसेच या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे पंचायत समिती कोपरगाव आणि विज्ञान गणित अध्यापक संघ द्वारा ५२ वे तालुक्यास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.या मध्ये कोपरगाव तालुक्यातून ३०० ते ३५० शाळांनी सहभाग नोंदवला होता. गणित व विज्ञान मिळून सुमारे ६०० च्या वर प्रयोग प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांने तयार केले होते.त्यात ज्ञानेश्र्वर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे.त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे.
यात कु.आयेशा अत्तार हिने गणितामध्ये स्थान मूल्य आणि विस्तारित रूपे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी उपकरण बनवले होते.संख्या विस्तारित किंवा मानक स्वरूपात लिहिली जाऊ शकतात.हे शिक्षण मार्गदर्शक तुम्हाला या संकल्पना सर्व विद्यार्थ्यांना स्पष्ट आणि प्रवेश योग्य पद्धतीने समजावून सांगण्यास मदत करेल.व्यावहारिक उदाहरणे आणि चरण-दर-चरण सूचना वापरून,मुले स्थान मूल्याचे महत्त्व आणि विस्तारित स्वरूपात संख्या कशी व्यक्त करायची हे समजून घेण्यास सहाय्य होणार आहे.
या उपकरणाच्या मदतीने आयेशाने अतिशय सोप्या भाषेत परीक्षकांना समजावून सांगितले.तसेच कृष्णांगी गायकवाड हिने जॉमेट्रीकल पार्क या विषयावर प्रोजेक्ट सादर केला.यात विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांनी मदत व मार्गदर्शन केले आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे,उपाध्यक्ष किरण भोईर,कार्यकारी संचालक विशाल झावरे,दिलीप सोनवणे,मुख्याध्यापक सचिन मोरे व तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच पहिली ते पाचवी विज्ञान गटात अमेय सोमोसे सहावी ते आठवीच्या गणित गटात अन्विता उदावंत व विज्ञान गटात राजेश्वरी होने,शिरीन शेख,नववी ते बारावीचे विज्ञान गटात यश हाडा,कृष्णा पासवान,नारायणी शिंदे,साईश्री कानडे व गणित गटात भक्ती देवडे या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग नोंदविला.सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.