जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयास स्मृती करंडक प्राप्त !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी कु.प्राप्ती बुधवंत व कु.सिद्धी वाघचौरे यांनी न्यू.आर्ट्स,काॅमर्स अँण्ड सायन्स कॉलेज,अहिल्यानगर आयोजित काॅम्रेड एकनाथराव भागवत स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.डॉ.विजय ठाणगे यांनी दिली आहे.


 

‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर निर्बंध असावे/नसावे’ यासारख्या अत्यंत ज्वलंत विषयावर महाविद्यालयाच्या अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी कु.प्राप्ती बुधवंत व कु.सिद्धी वाघचौरे ह्यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करून करंडक पटकावला आहे.  

  दि. 9 व 10 ऑक्टोंबर 2024 रोजी संपन्न झालेल्या या वादविवाद स्पर्धेत राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संघाने आपला सहभाग नोंदविला होता.यामध्ये के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगांव येथील कु.प्राप्ती बुधवंत व कु.सिद्धी वाघचौरे यांचाही समावेश होता.
   ‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर निर्बंध असावे/नसावे’ यासारख्या अत्यंत ज्वलंत विषयावर महाविद्यालयाच्या अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी कु.प्राप्ती बुधवंत व कु.सिद्धी वाघचौरे ह्यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करून करंडक पटकावला आहे.  
   या पूरस्काराचे रोख रक्कम ५ हजार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व करंडक असे पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे.
दरम्यान या दोन्ही विद्यार्थिनींनी प्रेमराज सारडा महाविद्यालय अ.नगर येथे संपन्न झालेल्या वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांकासह ज्ञानेश्वर करंडकही प्राप्त केला आहे.या स्पर्धेचा विषय ‘स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सरकारपेक्षा संस्कार महत्वाचे आहे’ हा होता.महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी दोनही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने को.ता.एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदिप रोहमारे,प्र.प्राचार्य प्रो.(डॉ.) विजय ठाणगे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी आदींनी अभिनंदन केले आहे.
   यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे,प्रा.संदिप जगझाप, प्रा.दिपक बुधवंत व इतर शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close