शैक्षणिक
इस्रोत जिल्हा पातळीवर जवळकेची विद्यार्थीनी पहिली
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
इस्त्रो आणि नासाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी आयोजित सहलीसाठी अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जवळके जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीतील विद्यार्थिनी अमिता जालिंदर थोरात हीची प्रथम क्रमांकाने निवड झाली असून द्वितीय स्थानी अनन्या वाल्मीक बागल,तर तृतीय स्थानी गीता दशरथ जोरावर हीची निवड झाली आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातल्या ३ शाळकरी मुला-मुलींना पहिल्यांदाच इस्रो अंतरिक्ष संस्थेच्या सहलीसाठी संधी मिळाली आहे.त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागावी.यासाठी वैज्ञानिक सहलीची योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत पाचवी व आठवीत शिकणाऱ्या जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रकल्पांची निवड करून या विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 42 पाठवले जाणार आहे.वैज्ञानिक सहलीला जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवी ते आठवी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नुकतीच तालुकास्तरावर 01 सप्टेंबर रोजी तर जिल्हा स्तरीय 08 सप्टेंबर रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.त्यानंतर ही जिल्हास्तरीय निवड जाहीर करण्यात आली असून त्यात जवळके येथील जिल्हा परिषद शाळेची ही विद्यार्थीनी अमिता थोरात ही यशस्वी झाली आहे.त्याचे सह सदर शाळेचे शिक्षक यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.या खेरीज तालुक्यातील ओगदी येथील शाळेचे विद्यार्थीनी अनन्या वाल्मीक बागल,गीता दशरथ जोरवर आदींनी निवड झाली असून या दोन्ही ओगदि येथील असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष येरेकर व प्राथमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली आहे.
“भारत टॅलेंट सर्च च्या वतीने प्रत्येक इयत्तेतील प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना केरळ राज्यातील थुंबा येथे इस्रो सहल तर द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थांना राज्यात इतर ठिकाणी शैक्षणिक सहल घडवणार होते.मात्र विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,त्यांच्या गुणांमध्ये असलेले अत्यंत कमी अंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करून यंदा प्रत्येक इयत्तेतील प्रथम,द्वितीय व तृतीय अशा तीनही क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना इस्रो अभ्यास सहलीला नेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.अमिता थोरात हिला मुख्याध्यापक मैड दत्तात्रय ज्ञानेश्वर,शिक्षक आंबिलवादे सुधाकर,बढे निवृत्ती रेवजी,गोसावी रवींद्र बाळपुरी,अंधारे रुक्मिणी नारायण,उगले सुरेखा भास्कर,बागुल कोमल उत्तम आदींचे मार्गदर्शन लाभले होते.
दरम्यान या स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आ.आशुतोष काळे,जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरें,गटविकास अधिकारी कृष्णा पाठक,तालुका शिक्षण अधिकारी शबाना शेख,जलसंपदांचे माजी उपभियंता एस.के.थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,मुख्याध्यापक दत्तात्रय मैड,आदींनी अभिनंदन केले आहे.
“इस्त्रोत जाण्यासाठी निवड झाली आहे.तिथे शास्त्रज्ञ संशोधन कसं करतात,अवकाशाचे कसं निरीक्षण होतं हे पाहणं महत्वाचं आहे.पुढे जाऊ जिल्हाधिकारी होण्याची इच्छा आहे.इस्त्रोत जाऊन जवळके गावाचं नाव मोठं करेन,अशी अपेक्षा अमिता थोरात हिने व्यक्त केली आहे.