जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

गुरूंचे कार्य महान-…या नेत्याचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा


संवत्सर-(वार्ताहर)

भारतात गुरूचे महत्व प्राचीन काळापासून असून गुरूंचा आदर कल्पना पाश्च्यात्य देशात १९ व्या शतकात अनेक देशांमध्ये रुजली; बहुतेक प्रकरणांमध्ये ते स्थानिक शिक्षक किंवा शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा साजरा करतात.इतर अनेक आंतरराष्ट्रीय दिवसांपेक्षा भिन्न देश हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करण्याचे हे प्राथमिक कारण स्थानिक असून भारतात हा आदर मोठा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

  

“भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला.आई जशी मुलांवर संस्कार करते,तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे,त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो”- राजेश परजणे,माजी सदस्य,जिल्हा परिषद,नगर.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीतील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षकांचा मोठा सत्कार करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे हे होते त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी अनिल आचारी,दिलीप ढेपले,दिलीप तिरमखे,मुख्याध्यापक,शिक्षक पालक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे भूमिका स्वीकारून दिवसभरासाठी ज्ञानदानाचे काम केलं तसेच ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी देखील शिक्षक भूमिका स्वीकारून ज्ञानदानाचा दिवसभर काम केले आहे.

   त्यावेळी पुढे  बोलताना ते म्हणाले की,”भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला.आई जशी मुलांवर संस्कार करते,तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे,त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो.जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो.त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच,५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात.तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील विद्यालयात तो मोठया उत्साहात संपन्न झाला आहे.

   याप्रसंगी बोलताना राजेश परजणे यांनी,”मुला-मुलींना आई-वडिलांपासून ते आपल्या गुरूंनी ज्ञानदान केलेला आहे म्हणूनच,’गुरुला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुदेव नमः अशी सार्थ उपमा दिलेली आहे.गुरुचे  कार्य फार महान आहे आपण कोणाकडून कोणाकडून शिक्षण घेत असतो तोच आपला गुरु असतो मुलांनी आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना आपल्या आई-वडिलांची आज्ञा गुरुजनांची आज्ञा पाळावी नेहमी चांगलं ते आत्मसात करावं वाईट संगत सोडावी व आपण गुरुजनांकडून चांगले ज्ञान आत्मसात करून आपल्या व आपल्या गुरुजनांचे नाव कमवावे असे आवाहन शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close