जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव – (प्रतिनिधी)

   कोपरगाव नजीक असलेल्या कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथालय दिवसाचे औचित्य साधुन ग्रंथ प्रदर्शन व स्पर्धा परिक्षा विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कोकमठाण येथील आत्मा मलिक करिअर अकॅडमीचे संचालक पंकज माळी यांनी मोठ्या उत्साहात केले आहे.

“आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण-घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे.स्पर्धा परीक्षा ही खूप व्यापक आणि मोठी संकल्पना असून विद्यार्थ्यांनी परिश्रम,जिद्द,चिकाटी उराशी बाळगून यश प्राप्ती करावी”- पंकज माळी,संचालक,आत्मा मलिक करिअर अकॅडमी, कोकामठाण.

भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो.ग्रंथालयांचा विकासात डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे.देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ.रंगनाथन यांची रूजवला.नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले त्यांचा जन्मदिन के.जे.सोमय्या महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

   सदर प्रसंगी के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.बी.बी.भोसले,ग्रंथालय विभागप्रमुख डॉ.निता शिंदे,डॉ.जे.एस.मोरे,डॉ.एस.बी.भिंगारदिवे,डॉ.वसुदेव साळुंके,विकास सोनवणे,गणेश पाचोरे,स्वप्निल आंबरे,रवि रोहमारे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

   यानंतर ग्रंथालय विभागाच्या वतीने पंकज माळी यांचे ‘स्पर्धा परिक्षा : ग्रंथालयाची भूमिका व महत्व’ या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले.यावेळी श्री माळी यांनी सांगितले कि,” ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो.आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण-घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे.स्पर्धा परीक्षा ही खूप व्यापक आणि मोठी संकल्पना असून विद्यार्थ्यांनी परिश्रम,जिद्द,चिकाटी उराशी बाळगून यश प्राप्ती करावी.यावेळी त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध परिक्षेचे स्वरूप व महत्त्व नमूद केले.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत करतानांच ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. स्पर्धा परीक्षेचे महागडे क्लास लावण्याइतपत परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातील ग्रंथालय हे दीपस्तंभ ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदर प्रसंगी ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. निता शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आहे.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रविंद्र जाधव यांनी तर मान्यवरांचे आभार प्रा. वर्षा आहेर यांनी मानले आहे.

    यावेळी ग्रंथालय विभागाच्या वतीने भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांचे अनेकानेक पुस्तके,मासिके व संदर्भ ग्रंथाचा समावेश करण्यात आला होता. याव्यतिरिक्त कथा-कादंबरी,आत्मचरित्र यांच्यासह स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close