शैक्षणिक
नीट परीक्षेत…या महाविद्यालयाचे लक्षवेधी यश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने दिनांक ०५ जुन रोजी नीटची परीक्षा घेण्यात आलेली होती.सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झालेला असून या परीक्षेत आत्मा मालिक कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु.पूर्वा लोढा हिने ७२० पैकी ६२१ गुण मिळवून या महाविद्यालयामध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान या विद्यार्थिनीच्या पाठोपाठ कु.वैदही खैरे ५९९, कु.प्रांजली खैरनार ५९४,कु.हर्षदा पवार ५४८,शिवतेज फापाळे ५२७, आदित्य जाधव ५१६,कु.अश्लेषा पवार ५०८,कु.साक्षी लोहकणे ४९८,प्रविण सानप ४८०,कु.प्रतिक्षा सहारे ४६१,सुयश गायकवाड ४४५,कु.सेजल पर्वत ४४१,ओम डेरे ४३८,कु.परिदी बडेरा ४३१,दिप लोढा ४२४,कु.निशा चौधरी ४०४,गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश मिळविले आहे .
यावेळी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हटले की,”शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून नीट व जेईई या परीक्षांची तयारी आकाश कोचिंग इंन्स्ट्यिूट च्या माध्यमातून करुन घेतली जाते.विद्यार्थ्यांना कॉलेज,क्लासेस,निवास व भोजन व्यवस्था एकाच छताखाली मिळत असल्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययानास वेळ मिळतो.आतापर्यंत एम.बी.बी.एस.साठी ३२, बी.डी.एस.साठी २० तर पशुवैद्यकिय साठी १५ विद्यार्थ्यांची शासकीय महाविद्यालयामध्ये निवड झालेली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,विश्वस्त प्रकाश भट,प्रकाश गिरमे,बाळासाहेब गोर्डे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक साईनाथ वर्पे,प्राचार्य नामदेव डांगे आदींनी अभिनंदन केले आहे.