शैक्षणिक
शालांत परीक्षेत…या शाळेचे मोठे यश !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांक
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच दहावीचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे.विशेष म्हणजे यंदा निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झाली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का वाढला असून या निकालात मुलींनी बाजी मारली मारली असल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील संस्थापक असेलेले केशवराव भवर यांची श्री गुरुदात्त इंग्लिश मिडीयम स्कुल अपवाद नाही.
दरम्यान या शाळेतील विद्यार्थिनी लाड़ सिद्धी विनोदकुमार हिने सर्वाधिक ९५ टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला त्यापाठोपाठ द्वितीय क्रमांक संकेत भाऊसाहेब गुंड ९४ टक्के व तृतीय क्रमांक कोळसे कल्याणी अजय ९३.४० टक्के मिळवले आहे.व एकूण ५२ पैकी १२ विद्यार्थी ९० टक्के व ३० विद्यार्थी ८० टक्के व १० विद्यार्थी ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे.
ग्रामीण भागात कोणत्याही शिकवणी सुविधा उपलब्ध नसताना केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतःच्या मेहनतीने सदर परीक्षेत शाळेचे एकूण ५२ विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने शाळेचे संस्थापक केशवराव भवर,संचालक स्वप्नील भवर,प्राचार्य दिपक चौधरी व सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.