जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या विद्यालयाचा इ.१२ वीचा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव नजीक कोकमठाण हद्दीत असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलचा सी.बी.एस.ई.इ.१२ वी विज्ञान शाखेचा २०२३-२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ.१० वीची उज्वल निकालाची परंपरा कायम राखत सीबीएसई इ.१२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून या ही वर्षी गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखली असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.

 

समता इंटरनॅशनल स्कूलचे इ.१२ वी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून सुजल फुलसुंदर याने ९७.२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे.मानसी वाकडे हिला ९०.४ टक्के तर खुशी कोठारी हिला ८६ टक्के गुण मिळाले असून यांनी अनुक्रमे द्वितीय,तृतीय क्रमांक मिळविला आहे.

   समता इंटरनॅशनल स्कूलचे इ.१२ वी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून सुजल फुलसुंदर याने ९७.२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे.मानसी वाकडे हिला ९०.४ टक्के तर खुशी कोठारी हिला ८६ टक्के गुण मिळाले असून यांनी अनुक्रमे द्वितीय,तृतीय क्रमांक मिळविला आहे.सर्वेश कांगणे याने ८५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे.

गायत्री देठे,अवनी कुलकर्णी,रोधा काळे,क्रिशना काळे,समृद्धी भुसारे,मृदुला सोनकुसळे,आशिष पानसरे,राजहंस आढाव,प्रेरणा सदाफळ,प्रतीक साळुंखे,तनिष्का औताडे,रूद्रा काले,शाश्वत सोनकुसळे,अंकुर कुकरेजा आदी विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे.

यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य,प्राचार्या हर्षालता शर्मा,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close