शैक्षणिक
…या विद्यालयाचे विद्यार्थी संस्थेला लौकिक मिळवून देतील-गवारे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“कोयटे विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे हुशार,होतकरू असून या विद्यालयातील विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या पदांवर कार्य करून कोयटे विद्यालयाचा नावलौकिक मिळवून देतील” असा विश्वास सचिन गवारे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव शहरातील निवारा परिसरात असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे २०२३ – २४ चे ‘नवरस : रंग भावनांचे’ वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कांतीलाल जोशी हे होते.
सदर प्रसंगी स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे,प्राचार्या हर्षलता शर्मा,न्याती समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर आत्तार , शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे,सदस्या जोत्सना पटेल,शोभाताई भावसार,रंगनाथ खानापुरे,गोविंद मधुकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे म्हणाल्या की,”गेल्या २२ वर्षापासून स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाच्या माध्यमातून अल्प उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना विद्यादानाचे सेवा भावी काम कोयटे परिवार करत आहेत.या विद्यालयात शिकणारा विद्यार्थी बौद्धिक व विविध कला गुणांनी परिपूर्ण व्हावा.यासाठी व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक-शिक्षिका नेहमीच प्रयत्नशील असतात.वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करणे हा देखील त्यातीलच एक भाग असून यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळतो असे शेवटी म्हणाले आहे.
सदर प्रसंगी विद्यालयातील श्रेया लाड,जानव्ही शर्मा,वेदिका दाभाडे,श्रेया कसबे,रजनी यादव,वेदिका गरड,आराध्या लाड, गौरी कुहिले, तन्वी काळे या विद्यार्थिनींनी नवदुर्गांची वेशभूषा करून अनुक्रमे शृंगार,हास्य,वीर,करुण,रौद्र,शांत,भक्ती,विभत्स भयानक अशा नव रसांची माहिती सांगितली.तसेच कलाविष्कारातून विविध भावनांच्या रंगांची सामूहिक नृत्य स्वरूपात कोयटे विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उधळण केली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका तृप्ती कासार यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभावरी नगरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका आशा मोकळ यांनी मानले आहे.
सदर स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षिका तृप्ती कासार,मनिषा कांबळे,स्वप्नाली महिरे,जागृती ठाकूर,छाया ओस्तवाल,नाजमिन अत्तार,सोनाली पवार,त्रिवेणी पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे.