जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे सोमैया महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, हिंदी अभ्यास मंडळ व महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदी पाठ्यक्रम निर्मिती’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती.

  

“नवीन शैक्षणिक धोरण व हिंदी पाठ्यक्रम निर्मिती यावर मार्गदर्शन करतांना पाठ्यक्रम निर्मिती ही विद्यार्थी व रोजगारकेंद्रित असणे आवश्यक आहे”-प्रा.डॉ.सदानंद भोसले,समन्वयक,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,हिंदी अभ्यास मंडळ.

या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रा.डॉ.सदानंद भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.विजयकुमार रोडे,डॉ.पुरुषोत्तम कुंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.


   कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात प्रा.डॉ.सदानंद भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरण व हिंदी पाठ्यक्रम निर्मिती यावर मार्गदर्शन करतांना पाठ्यक्रम निर्मिती ही विद्यार्थी व रोजगारकेंद्रित असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

   प्रा.डॉ.विजयकुमार रोडे यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषा,साहित्य व समाज यांचा सहसंबंध नमूद करतानांच
पाठ्यक्रम हा विद्यार्थ्यांची संशोधन दृष्टि वाढविणारी असल्याचे नमूद केले.

   सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यादव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या पाठ्यक्रम निर्मिती कार्यशाळेचे कौतुक करतांना हिंदी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर आधारित बनविलेल्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होईल असे म्हटले आहे.

सदर कार्यशाळेच्या दोनही सत्रात डॉ.पुरुषोत्तम कुंदे,प्रा.बाळासाहेब सोनवणे,प्रा.नानासाहेब जावळे,डॉ.वैशाली खेडकर, डॉ.अनंत केदारे या अभ्यास मंडळातील सदस्यांनी बनविलेल्या हिंदी अभ्यासक्रमाचे प्रस्तुतिकरण करतांनाच उपस्थित प्राध्यापकांच्या शंकेचे निरसन केले तसेच प्राध्यापकांच्या वतीने आलेल्या सूचनांचा समावेश अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सांगितले.

   या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.जिभाऊ मोरे तर उपस्थित मान्यवरांचा परिचय डॉ.संजय दवंगे यांनी करून दिला. कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रध्दा सिनगर यांनी तर आभार प्रा.जयश्री ठोकळे यांनी केले आहे.

सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे,प्रा.किरण सोळसे,संजय पाचोरे,संजय वेताळ यांनी विशेष परिश्रम घेतले.हिंदी अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेसाठी अ.नगर व नाशिक जिल्हातील हिंदी विषयाच्या बहुसंख्य प्राध्यापकांचा लक्षणीय प्रतिसाद होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close