शैक्षणिक
कोपरगावात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व माजी आ.कै.के.बी.रोहमारे यांच्या स्मरणार्थ ‘के.बी.रोहमारे स्मृती-करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन मंगळवार दि.८ मार्च रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे.
“यापूर्वी १९७६ पासून महाविद्यालयात होणारी भि.ग. रोहमारे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठेची मानली जात होती.मात्र नंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू झाल्याने तिला प्रतिसाद कमी मिळाला व १९८९ नंतर ती थांबविण्यात आली.त्याच स्पर्धेचे २०१६ पासून वरील वक्तृत्व स्पर्धेत रूपांतर करून तिचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे”-डॉ.बी.एस.यादव,प्राचार्य,के.जे.सोमैय्या महाविद्यालय.
या स्पर्धेचे उद्घाटन इतिहासाचे ज्येष्ठ संशोधक व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात सकाळी ९.३० वाजता संपन्न होणार आहे.
सदर प्रसंगी प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुधीर डागा,महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.व्ही.सी.ठाणगे उपस्थित होते.
“या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या संघास कायमस्वरूपी आकर्षक के.बी.रोहमारे स्मृती करंडक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.तर स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या स्पर्धकास अनुक्रम रोख रु.१० हजार, रु.०७ हजार,रु.०५ हजार व करंडक तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.०१ हजार ची दोन पारितोषिके व करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे व स्पर्धकांची संख्या लक्षात घेता स्पर्धा दोन दिवस चालण्याची शक्यता आहे.या स्पर्धेत नाव नोंदणी करावयाची असल्यास इच्छुक वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धकांनी संयोजक प्रो.जे.एस.मोरे (९८३४३१४३६७) व प्रा. ठाणगे व्ही.सी. (९८२२६७१८४५) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
“यावर्षी संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत व आस्था असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य व कर्तृतत्वाशी संबंधित ‘धर्मनिरपेक्ष जाणता राजा: शिवछत्रपती’ हा विषय या वक्तृत्व स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला असून स्पर्धेस मोठ्या स्वरूपात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे. याशिवाय स्पर्धेचे उद्घाटक डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान ऐकण्याची संधीही स्पर्धक व विद्यार्थ्यांना लाभणार आहे.त्यामुळे या संधीचा विद्यार्थी,स्पर्धक व नागरिक यांनी लाभ घ्यावा” असे आवाहन संस्थेचे सचिव ऍड.संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे यांनी येथे केले आहे.