शैक्षणिक
प्राचार्या सुरवसे सेवानिवृत्त,सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर येथील प्राचार्या मंजुषा सिद्धेश्वर सुरवसे या आपल्या प्रदिर्घ सेवेतून दि.३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम सकाळी ११ वाजता ‘कलश मंगल कार्यालयात’ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदर प्रसंगी सकाळी १०.४५ वाजता कोपरगाव येथील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्या मंदिर शाळेच्या संरक्षण भिंतीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदर प्रसंगी प्राचार्या मंजुषा सुरवसे यांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयतचे जनरल बॉडी सदस्य बिपीन कोल्हे हे राहणार आहे.तर या कार्यक्रमास राज्य पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,जनरल बॉडी सदस्य माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,बाळासाहेब कदम,कारभारी आगवन,मच्छीन्द्र रोहमारे,अरुण चंद्रे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,रयतचे विभागीय अधिकारी शिवाजी तपकिर,सहाय्यक अधिकारी काकासाहेब वाळुंजकर,नंदकिशोर गायकवाड,कोपरगाव पंचायत समितीच्या प्रभारी गट शिक्षण अधिकारी शबाना शेख,सिद्धेश्वर सुरवसे,रमेश सुरवसे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.