जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेतील यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ च्या परीक्षेत शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीअम स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांना लक्षवेधी यश प्राप्त केले असून सदर परीक्षेत ३०० गुणापैकी शाळेतील इयत्ता ८ वीचे एकूण १३ पैकी १३ व इयत्ता ५ वीचे २४ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा शेकडा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक केशवराव भवर यांनी दिली आहे.

“ग्रामीण भागात आमच्या संस्थेने जो,’गुरुदत्त पॅटर्न’ तयार केला आहे यामध्ये शाळेतील शिक्षक यांचे प्रामाणिक प्रयत्न व कष्ट तसेच मुलाच्या पालकांचे मोलाचे सहकार्य या दोन्ही महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.याचीच पावती म्हणून हे नेत्रदिपक यश आज बघायला मिळत आहे”-केशवराव भवर,संस्थापक,श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीअम स्कूल शिरसगाव.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी च्या प्रसिद्धी पत्रकानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आली होती.सदर परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आला असून यात हे यश सिद्ध झाले आहे.

प्रसिद्धी पत्रकात संस्थेने म्हटले आहे की,”इयत्ता ८ वी चे भक्ती काळे हिने २१४, हर्ष अभंग २१२,मोहित थोरात २१०,साईशा उकिरडे २०८,रोहित वाघ २०२, रोहित मोकळ २००,समृद्धी चौधरी २००,वेदांत भवर १९६,श्रद्धा खिल्लारी १९४,अथर्व निकाळे १८६ असे १० विद्यार्थी विशेष प्रावीण्य गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे.तसेच शाळेतील इयत्ता ५ वीचे विद्यार्थी साई शिंदे २२६,खुशी निघोट २२४, शुभम मालकर २२२,कृषीका भवर २२२ असे ४ विद्यार्थी विशेष प्रावीण्य गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे.

संस्थेचे संस्थापक केशवराव भवर,संचालक स्वप्नील भवर,मुख्याध्यापक दिपक चौधरी यांनी सदर यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.सदर विद्यार्थ्याच्या यशामागे शाळेतील शिक्षक संतोष मलिक, रत्नमाला अभंग,प्रवीण चव्हाण,बाबासाहेब काळे,परवीन पठाण,तुषार बागल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहेत.सदर निकालाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close