शैक्षणिक
…या शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रवेश सुरू

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये २२४ जागांसाठी प्रवेश प्रकियेला सुरूवात झाली आहे. दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यानी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ११ जूलै पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.के.जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत सात व्यवसाय उपलब्ध आहेत.विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना ही लागु करण्यात आलेली आहे.दहावी अनुत्तीर्ण विदयार्थ्याना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते.
औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपला अर्ज सादर करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत.प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्याबाबत औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येते.
शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत सात व्यवसाय उपलब्ध आहेत.विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना ही लागु करण्यात आलेली आहे.दहावी अनुत्तीर्ण विदयार्थ्याना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते.तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विदयार्थ्यानी आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करुन त्वरीत रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आय.टी.आय.मध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन श्री.जाधव यांनी केले आहे.