शैक्षणिक
कोपरगावात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती दिन साजरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलिस ठाणे व तालुका तालुका पोलिस ठाणे यांच्या संयुक्तविद्यमाने कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालयात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन जनजागृती मार्गदर्शन शिबीर ग्रामीण पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व शहर पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आहे.
अमली पदार्थांचा दुरुपयोग आणि दुषप्रभावांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर सहाय्यकारी व्यासपीठांच्या माध्यमातून युद्ध स्तरीय अभियान चालवले जात आहे.२००६ ते २०१३ दरम्यान केवळ ७६८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते,मात्र अमली पदार्थांच्या विरोधात भाजप सरकारने धोरण बदलले असून त्यात त्यांनी २०१४ ते २०२२ या नऊ वर्षाच्या काळात सुमारे तीस पट अधिक म्हणजेच २२ हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.आणि अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या लोकांच्या विरोधात पूर्वीच्या तुलनेत १८१% अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.यातून अमली पदार्थ मुक्त भारताप्रति मोदी सरकारची कटीबद्धता दिसून येत असल्याचे मानले जात आहे.यासोबतच जून २०२२ मध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा पुनर्वापर रोखण्यासाठी एक अभियान चालवण्यात आले ज्या अंतर्गत आजवर देशभरात जप्त करण्यात आलेले सुमारे ०६ लाख किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले असल्याचा दावा केला आहे.तर देशभर याबाबत जनजागृती केली जात आहे.त्या अभियानाचा भाग म्हणून कोपरगाव शहरातील के.जे.सोमैय्या महाविद्यालयात,’अंमली पदार्थ विरोधी जनजागृती दिन’ शहर व तालुका पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे तसेच लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे संचालक डॉ.कांतीलाल वक्ते आदी मान्यवर उपस्थित होते
या प्रसंगी ग्रामीण पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,”आज संपूर्ण जगात अमली पदार्थांचे सेवन वाढलेले आहे त्यामुळे मोठया प्रमाणात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांना अनेक शारीरिक व मानसिक आरोग्याचे समस्याना तोंड द्यावे लागत आहे.त्यातून सामाजिक व पारिवारिक वातावरणही बिघडत चाललेले आहेत.त्याला वेळीच आला घालण्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.म्हणून केवळ पोलिसांवरच सर्व भिस्त न ठेवता पालकांनी देखील जागृत राहात आपल्या पाल्याना व्यसनापासून दूर राहण्यासाठी लक्ष देयला हवे.अमली पदार्थ,गुटखा दारू,सिगारेट,तंबाकूजन्य पदार्थ हे मानवी शरीराला अत्यंत घातक असून त्यामुळे आजकालच्या युवकांनी या घातक व्यवसनापासून दूर राहत अभ्यासाचे,व्यायामाचे व्यवन अंगिकारावे असे आवाहन पोलिस निरीक्षक देसले यांनी शेवटी केले आहे.
या प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक भरत दाते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या दिनाचे महत्त्व विशद करून कार्यक्रमाच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट करणे विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगत व्यसन करणाऱ्या विरोधात कायद्यातील कठोर शिक्षा याबद्दल माहिती दिली आहे.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाईट सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला देत.महाविद्यालय परिसरात कुठेही अमली पदार्थ विक्री होत नाही व आम्ही कधीच होऊ देणार नाही असा शब्द दिला.
सदर प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रा.डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पो.कॉ.राम खारतोडे यांनी व्यक्त केले आहे.