निधन वार्ता
सोन्याबाई कासार यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
संवत्सर येथील जुन्या पिढीतील महिला सोन्याबाई कृष्णाजी कासार (वय-१०३ वर्ष) यांचे नुकतेच निधन झाले.संवत्सर येथे गोदावरीतिरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. परिसरातून मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
अंत्यविधी प्रसंगी संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष छनुदास वैष्णव,कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे,रवींद्र देशमुख,मधुकर साबळे यांनी श्रध्दांजली वाहिली.कै.सोन्याबाई या भाजपाचे प्रांतिक सदस्य भाऊसाहेब कासार,रावसाहेब कासार,चंद्रकांत कासार यांच्या मातोश्री तर डॉ.स्वप्नील पाटील यांच्या आजी होत.त्यांच्यामागे सुना नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.