निधन वार्ता
जयवंत भोकरे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयवंत भिमाजी भोकरे (वय-९०) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्यावर संवत्सर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरांत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.
स्व.जयवंत भोकरे हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिसरात प्रसिद्ध होते.त्यांच्या निधनाने गोदावरी-परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे यांनी दुःख व्यक्त केले आहे.गोदावरी दूध संघाचे कर्मचारी मच्छिद्र भोकरे यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.