निधन वार्ता
कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती…यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती व वकील संघाचे जेष्ठ सदस्य ऍड.भागवत यमाजी काळवाघे (वय-९१) रा.शिंगवे यांचे पहाटे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज गोदावरी काठी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातारणात
अंत्यविधी संपन्न झाला आहे.
स्व.भागवत काळवाघे हे १९८० च्या दशकात कोपरगाव पंचायत समितीचे पंधरा वर्षे सभापती होते.तसेच ते संजीवनी साखर कारखाना व गणेश सहकारी साखर कारखान्याचे ते लेबर ऑफिसर होते.त्यांनी कोपरगाव न्यायालयात ५० वर्ष अविरत सेवा बजावली होती.
आज दुपारी १ वाजता कोपरगाव न्यायालयात मान्यवर न्यायाधीश व वकील संघाचे पदाधिकारी व वकील संघाचे सदस्य यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ऍड.काळवाघे यांच्या निधनाबद्दल वकील संघाचे अध्यक्ष ऍड.शिवाजी खामकर,उपाध्यक्ष मनोज कडू,माजी अध्यक्ष ऍड.जयंत जोशी,शंतनू धोर्डे,सरकारी अभियोक्ता अशोक वहाडणे,ऍड.दिलीप लासुरे,ऍड.योगेश खालकर,ऍड.प्रदीप रणधीर,ऍड.बाबासाहेब सोनवणे आदी मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.